'त्या' एका स्वप्नामुळे बदललं अख्खं आयुष्य, अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय

'स्वप्नात दिसायचा भयंकर मृत्यू', त्या स्वप्नामुळे बदललं आयुष्य अभिनेत्रीनं सांगितली कहाणी

Updated: Jul 25, 2022, 05:43 PM IST
'त्या' एका स्वप्नामुळे बदललं अख्खं आयुष्य, अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय title=

मुंबई : मला स्वप्नात जळणारी कबर दिसायची, मी जर सुधारले नाही तर माझा मृत्यू असा होईल असे संकेत मला मिळत होते असं मला वाटायचं. या स्वप्नांनी मी खूप घाबरले होते. त्यामुळे मी बदलण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

अभिनेत्री सना खानने फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली. एका झटक्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने सगळं ऐश्वर्य प्रसिद्धी सोडून इस्लानचा रस्ता निवडला. तिने हैदराबादमधील प्रसिद्ध व्यावसायिक आणि मौलवी अनस सैय्यद यांच्याशी लग्न केलं. या अभिनेत्रीनं आपला अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला. 

व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणते की, ''मला माझं आयुष्य बदलावं असं वाटलं ते एका दृष्टांतामुळे. तिने सांगितलेला हा अनुभव ऐकून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. सना व्हिडीओमध्ये म्हणाली की, मला माझ्या आधीच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या. पण शांतता आणि समाधान नव्हतं. माझ्याकडे सगळं आहे पण मी आनंदी नाही? ''

''त्यावेळी मला काही संकेत मिळाले. 2019 सालची गोष्ट आहे. मला रमजान दिवशी जळणारी कबर दिसत होती. या कबरमध्ये मला मी जळताना दिसत होते. माझ्याकडे सगळं आहे पण मी खूश नव्हते. मला खूप डिप्रेशन येत गेलं. मला सतत भीती वाटत होती. ''

''मी त्या दिवसापासून बदल करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसापासून मी नेहमी हिजाब परिधान करण्याचा निर्णय घेतला. तो आजही कायम आहे. मी खूप स्कार्फ खरेदी केले. मी माझ्या वाढदिवशी माझ्या स्वत: ला एक वचन दिलं की आजपासून मी डोक्यावरच्या स्कार्फ उतरवणार नाही.''