ममता कुलकर्णी - संजय दत्तचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

ममता कुलकर्णीचा व्हिडिओ व्हायरल 

ममता कुलकर्णी - संजय दत्तचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?  title=

मुंबई : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट ट्रेंड होईल याचा काही नेम नाही. यूट्यूबवर अनेक व्हिडिओ ट्रेंड होत असतात. त्या ट्रेंड मागे काही खास कारण नसतं. पण हे व्हिडिओ आपल्याला नॉस्टॅलजीक करतात हे मात्र नक्की. आता सध्या यूट्यूबर अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि संजय दत्त यांच्या 'आंदोलन' या सिनेमातील व्हिडिओ ट्रेंड होत आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर चौथ्या क्रमांकावर आहे. हा व्हिडिओ अचानक का ट्रेंड होतोय याच कारण अद्याप कळलेल नाही. बहुदा संजय दत्त यांच्यावर आधारित 'संजू' हा बायोपिक शुक्रवार 29 जून रोजी प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने हा व्हिडिओ ट्रेंड होत आहे. 

हा व्हिडिओ आंदोलन या सिनेमातील काही कट्सने तयार केला आहे. या सिनेमांत ममता कुलकर्णी, गोविंदा आणि संजय दत्त असे तीन जबरदस्त कलाकार आहे. ममता आणि गोविंदा एकमेकांवर भरपूर प्रेम करत असतात. पण हे प्रेम व्यक्त मात्र कुणीच करत नाही. या दोघांचा कॉलेज मित्र संजय दत्त दाखवला असून तो यांना प्रेम व्यक्त करण्यासाठी मदत करतो. यानंतर गोविंदा पुढील शिक्षणासाठी परदेशात जातो. एका वर्षाने मुंबईत आल्यानंतर संजय दत्त त्याला बदलेला दिसतो. संजय दत्त या काळात वाईट मार्गाला लागलेला दिसतो.

हा व्हिडिओ सध्या ट्रेंड होत आहे. तसेच आपल्याला माहित आहे संजय दत्त अंडरवर्ल्डशी असलेला संबंध हा त्याच्या जीवनातील एक काळी बाजू आहे. खूप खराब काळ संजय दत्तसाठी होता. हा काळा त्याच्या संजू या सिनेमांतही दाखवण्यात आला आहे. रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारत आहे.रणबीर कपूरने साकारलेला संजू सर्वांसाठी धक्कादायक आहे. सगळीकडेच याची चर्चा रंगली आहे.