सुबोध भावेसोबत 'ही' लहान मुलगी कोण?

काय आहे या फोटोत

सुबोध भावेसोबत 'ही' लहान मुलगी कोण?

मुंबई : आपल्या हटके अभिनयातून सुबोध भावे कायमच वेगळा ठरला आहे. ''बालगंर्धव', 'कट्यार काळजात घुसली', 'लोकमान्य - एक युगपुरूष'  यासारख्या सिनेमांमधून सुबोध कायम आपल्याला भावला. आता सुबोधने छोट्या पडद्यावर पदार्पण केलंय. 'तुला पाहते रे' या सिनेमात सुबोध विक्रांत सरंजामे या उद्योगपतीची भूमिका साकारत आहे. या मालिकेत विक्रांतला आपल्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या इशा जवळची वाटते. तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी विक्रांत प्रयत्न करत आहे. अशी या मालिकेची कथा... सध्या ही मालिका अतिशय लोकप्रिय होत आहे. असं असताना सुबोधने एका लहान मुलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 

या फोटोत सुबोध आणि गायत्री म्हणजे तुला पाहते रे या मालिकेतील विक्रांत आणि इशा यांचा फोटो आहे. तर इतर दोन फोटोत सुबोध भावे आणि एका लहान मुलीचा फोटो आहे. एका फोटोत ही लहान मुलगी सुबोधकडून पारितोषिक स्विकारताना दिसत आहे. हा फोटो खूप व्हायरल होत असताना 'जग किती गोल आहे' अशी देखील चर्चा आहे. काय आहे या फोटोत पाहा....  

या पोस्टमध्ये सुबोधने लिहिलं आहे. 'दुनिया गोल आहे'.काही वर्षांपूर्वी सुबोधने एका मुलीला आपल्या हस्ते बक्षिस दिलं होतं. तेव्ही ती मुलगी म्हणाली होती, मला तुमच्यासोबत काम करायचं. तेव्हा माहित नव्हतं की, हे वाक्य खरं होईल. पण अनेक वर्षानंतर हे खरं झालं. आज तुला पाहते रे या मालिकेत इशा म्हणजे गायत्री दातार जी अभिनेत्री आहे. तिच ही लहान मुलगी आहे. अनेक वर्षांनी ही गोष्ट खरी झाली आहे. हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.