समांथाला का नाही आणलं? सासरे नागार्जुन यांनी थेट विजयलाच विचारला प्रश्न

Samantha Ruth Prabhu :  समांथा रुथ प्रभूला पाहिलं नाही म्हणून तिच्या सासऱ्यांनी चक्क विजय देवरकोंडाकडे केली तिची विचारपूस... व्हिडीओ एकदा पाहाच...

दिक्षा पाटील | Updated: Sep 4, 2023, 03:35 PM IST
समांथाला का नाही आणलं? सासरे नागार्जुन यांनी थेट विजयलाच विचारला प्रश्न  title=
(Photo Credit : Social Media)

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभू हे दोघे सध्या त्यांच्या 'खुशी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असूनही विजय त्याच्या या चित्रपटाचं प्रमोशन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तो अजूनही प्रमोशनसाठी जिवतोड मेहनत करत आहे. 

खूशी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला विजय बिग बॉस तेलुगूच्या 7 व्या सीझनमध्ये पोहोचला होता. बिग बॉस हा तिथला खूप लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहे. त्याच कार्यक्रमात विजय पोहोचला होता. या कार्यक्रमाच्या सातव्या सीजनची प्रेक्षक अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत असताना. काल या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. त्यात याच कार्यक्रमाचा एक नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. त्यात अभिनेता नागार्जुन जे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आहेत. ते विजय देवरकोंडाला समांथा रुथ प्रभू म्हणून त्यांचा मुलगा नागा चैतन्यच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या आरोग्याविषयी विचारताना दिसतात. नागार्जुन हे गेल्या अनेक काळापासून बिग बॉस तेलुगूचे सुत्रसंचान करत आहेत.

विजय देवरकोंडा 'खुशी'च्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात आला होता. नागार्जुन अक्किनेनी हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. शोच्या प्रीमियरदरम्यान, नागार्जुननं विजय देवरकोंडाला विचारले की तो एकटा आला आहे का आणि समांथा रुथ प्रभू त्याच्यासोबत का आली नाही? यानंतर पुढे काय होतं ते दाखवण्यात आलेलं नाही. 

हेही वाचा : धर्माची खिल्ली उडवल्यानं राखीवर भडकली गौहर खान म्हणाली, 'अबाया परिधान केल्यानं...'

समांथा आणि नागार्जुनच्या रिलेशनशिपविषयी बोलायचे झाले तर त्यांचा मुलगा नागा चैतन्यशी समांथा अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या वर्षी 21 ऑक्टोबर रोजी त्या दोघांनी घटस्फोट घेतल्याची माहिती सगळ्यांना दिली. समांथा विषयी बोलायचे झाले तर ती एकामागे एक असे दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना देत आहे. खूशा या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर समांथा रुथ प्रभू ही विजय देवरकोंडासोबत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. दोघांची लव्ह स्टोरी या चित्रपटात दिसणार आहे. तर प्रेक्षकांना त्या दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडली आहे.