मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी जेवढी तिच्या सोज्वळतेमुळे प्रसिद्ध आहे. तेवढीच ती तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपुर्वी प्लॅनेट मराठीच्या पटलं तर घ्या या कार्यक्रमात वैभव तत्ववादी आपला क्रश असल्याचं तिने सांगितलं होतं. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटानंतर प्राजक्ताला वैभव तत्ववादी तिला आवडू लागला होता. आई तुला वैभव जावई म्हणून चालेल का? अशी तिची ईच्छा तिने आपल्या आईकडे व्यक्त केली होती. मात्र तिने पुढे हा गंमतीचा भाग आहे असंही स्पष्टीकरण दिलं.
आज प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 'पटलं तर घ्या'मध्ये प्राजक्ताने दिलेली ही मुलाखत इतकी व्हायरल झाली की, तिच्या आणि वैभवच्या लिंकअपच्या बातम्यांनी जोर धरला. मात्र आता वैभवने या प्रकरणावर मौन सोडलं आहे. दिलेल्या एका मुलाखतीत वैभव म्हणाला की, तिने तिच्या आईकडे माझा लग्नाचा प्रस्ताव मांडला, हे तिने देखील कधी मला सांगितलं नाही. हे खरंच खूप गंमतीशीर आहे. लोकं आम्हाला लग्न कधी करणार याबद्दल विचारतात. प्राजक्ताने केलेलं हे वक्तव्य एक गंमत होती. तसं आमच्यात कधीच काहीच नाहीये. प्राजक्ता माझी खूप चांगली मैत्रीण आहे. यापुढे आमच्यात काहीच नाहीये.
वैभवच्या या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या चाहत्यांना प्राजक्तासोबत लग्न करणार का? या प्रश्नावर उत्तर मिळालं आहे. अनेकदा वैभव आणि पुजा सावंत एकत्र दिसतात. त्यामुळे ते दोघांना डेट करत असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. तर प्राजक्ताच्या लग्नाची मात्र तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
प्राजक्ता माळीच्या लग्नाच्या अफवा बऱ्याचदा सुरु असतात. मात्र प्राजक्ताने आजपर्यंत कधीच लग्न कधी करणार या प्रश्नावर स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. आता प्राजक्ता कधी आणि कुणासोबत लग्न करणार याची उत्सुकता आता तिच्या चाहत्यांना लागली आहे. प्राजक्ताने काही दिवसांपुर्वी प्राजक्तराज हा तिच्या नवाकोऱ्या दागिन्यांचा ब्रँण्ड तिच्या चाहत्यांसाठी घेवून आली आहे. ज्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.
नुकताच प्राजक्ताने तिच्या दागिन्यांच्या ब्रँण्डबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता एक पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहीलं की, 'तुम्ही ''प्राजक्तराज- पारंपरिक मराठी साज' ला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलोय, आणि आजपासून आणखी १३ नवीन अलंकारासहीत तुमच्या सेवेसाठी सज्ज झालोय.
बोरमाळ, साज घाट मंगळसूत्र, चित्तांग, तांदळ्या, कोयरी तोडे आणि बरच काही…'