एक्स गर्लफ्रेंडसोबतच लग्नबंधनात अडकणार सलमान खान? व्हिडिओ व्हायरल

Salman-Sangeeta Eid Party Video: सलमानचा हा व्हिडिओ Varinderchawla या सोशल मीडिया हँन्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

Updated: Apr 24, 2023, 12:42 PM IST
एक्स गर्लफ्रेंडसोबतच लग्नबंधनात अडकणार सलमान खान? व्हिडिओ व्हायरल title=

Salman Khan - Sangeet Bijlani: नुकताच ईद हा सण मोठ्या थाटा माटात सर्वत्र पार पडला. सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सगळ्यांनीच हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ईदच्या निमीत्ताने  अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्मा यांनी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सगळ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

सलमान खान, अरबाज खान, शहनाज गिल, पलक तिवारी, जगपति बाबू, कंगना रनौत, इब्राहिम अली खान, तब्बू, कटरीना कैफ, कार्तिक आर्यन, अनिल कपूर, आमिर खान, सोनाक्षी सिन्हा, जहीर इकबाल, हुमा कुरैशी, एमएस धोनीची पत्नी आणि मुलगीही या पार्टीत सहभागी झाली होती. मात्र चर्चा झाली ती, सलमान खानची. कारण यावेळी या पार्टित सलमानसोबत एक्स संगिता बिजलानीपण  (Sangeeta Bijlani)पोहचली होती.

आता त्याच पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दोघंही एकमेकांसोबत दिसत आहेत. सलमानचं आणि संगिता बिजलानीचं भलेही ब्रेकअप झालं असलं तरी आजही दोघांमधील बॉन्डिंग अप्रतिम आहे. एकेकाळी ही जोडी खूप चर्चेत आली होती. या जोडीने एकमेकांना १० वर्ष डेट केलं होतं. सलमान आणि संगिता लग्नबंधनातही अडकणार होते. येवढंच नव्हेतर या जोडीच्या लग्न पत्रिकादेखील छापल्या होत्या मात्र अचानक ऐनवेळी संगिताने हे लग्न मोडलं. आणि सगळंच थांबलं. लग्न तुटण्यामागेच सलमानला गृहीत धरण्यात आलं. 

२७ मे १९९४ रोजी ही जोडी लग्न करणार होती. यानंतर संगीताने क्रिकेटर मो. अजहरुद्दीन लग्न केलं. मात्र हेही लग्न फार काळ टिकू शकलं नाही. लवकरच यांचा घटस्फोट झाला. मात्र आता सलमान आणि संगितामध्ये खूप छान मैत्रीचं नातं आहे. बऱ्याचदा हे दोघंही एकत्र दिसतात. त्यामुळे अनेकदा या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या. सलमानच्या वाढदिवशीही संगिता सलमानसोबत दिसली होती. यावेळी  सलमानने तिला कारपर्यंत सोडले होतं. एवढंच नव्हेतर त्याने तिला मिठी मारून तिच्या फोरहेडवर किस केलं होतं.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

.हा व्हिडिओ Varinderchawla या सोशल मीडिया हँन्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहीलं आहे की, सलमान फक्त संगीतासोबत खूश दिसतो. लग्न करा. तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय की, first is first.तर अनेकजण या दोघांनी लग्न करावी अशी ईच्छा कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करत आहेत.