'विराटनं आता...'; विक्रमी खेळीनंतर Team India च्या खेळाडूविषयी हे काय म्हणाली कंगना?

Kangana on Virat Kohli: विराटच्या शतकी खेळीनंतर कंगनाचीही प्रतिक्रिया... आता काय म्हणाली 'क्वीन'? सोशल मीडियावर चर्चा एकच.... कंगना नेमकं म्हणालीये तरी काय?

सायली पाटील | Updated: Nov 17, 2023, 02:35 PM IST
'विराटनं आता...'; विक्रमी खेळीनंतर Team India च्या खेळाडूविषयी हे काय म्हणाली कंगना?  title=
world Cup 2023 Bollywood Actress Kangana Ranaut praises virat kohli post record break innings

Kangana on Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. पाकिस्तानपासून न्यूझीलंडपर्यंत बऱ्याच संघांना पराभूत करत Rohit Sharma च्या नेतृत्त्वाखालील या संघानं आता World Cup 2023 मधील अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठला. नुकत्याच पार पडलेल्या Semi Final मध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला आणि दणक्यात अंतिम फेरी गाठली. 

IND Vs NZ सामना अनेक कारणांसाठी खास ठरला. त्यातलं एक कारण म्हणजे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी झालेली सेलिब्रिटी मंडळींची गर्दी आणि दुसरं कारण म्हणजे विराट कोहलीची विक्रमी खेळी. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विराटनं सेमीफायनलमध्येही शतकी खेळी केली. त्याची ही खेळी खऱ्या अर्थानं विक्रमी होती, कारण एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये शतकांचं अर्धशतक अर्थात 50 शतकी खेळी करत त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

हेसुद्धा वाचा : Rohit Sharma: रोहित शर्मा दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? लग्नाच्या पत्रिकेवर रितीका नव्हे तर भलतंच नाव!

 

इथं विराटनं शतकांचं अर्धशतक केलं आणि तिथं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. चाहत्यांसह सर्वच स्तरातील नामवंतांनीही विराटच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. अभिनेत्री कंगना रणौतनंसुद्धा भारतीय क्रिकेट संघातील या धडाकेबाज खेळाडूचं कौतुक केलं. 

... पण, कंगना काय म्हणाली? 

'किती अदभूत आहे हे! हा कोहलीनंच घातलेला एक कमाल पायंडा असेल की तो त्याचे विक्रम मोडणाऱ्यांशी कसा व्यवहार करतो. त्यानं त्या धरणीची पूजाच करायला हवी ज्यावर तो चालतो...हा एक उत्तम चरित्र असणारा आणि एक अदभूत व्यक्ती आहे', असं कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलं. 

world Cup 2023 Bollywood Actress Kangana Ranaut praises virat kohli post record break innings

विरुष्काच्या जोडीचंसुद्धा केलेलं कौतुक 

कंगनानं विराटचं कौतुक करण्याचीही पहिलीच वेळ नाही. कारण, यापूर्वीही तिनं त्याचं असंच कौतुक केलं होतं. पण, तिथं विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माचाही उल्लेख होता. क्रिकेट सामन्यांपूर्वी विराट आणि अनुष्कानं उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भेट देत दर्शन घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याचाच संदर्भ जोडत, 'ही जोडी एक पॉवर कपल' असल्याचं वक्तव्य तिनं केलं होतं.