चारुचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओचा सध्या सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनची मेहुणी आणि टीव्ही अभिनेत्री चारू आसोपा नेहमीच तिच्या बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. चारूचं लग्न सुष्मिताचा धाकटा भाऊ राजीव सेनशी झालं आहे. चारू सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. कायमच चारु तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच चारूचा बाथटबमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडिओचा सध्या सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे
चारू असोपाने तिचे बाथटबमधील व्हीडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या व्हीडिओमध्ये चारू बाथटबच्या पाण्यात आनंद घेत आहे. या व्हीडिओवर 'शाम है कोई जैसे की नदी' हे गाणे चालू आहे. या व्हिडिओमध्ये एक मेणबत्ती देखील जळताना दिसत आहे. तसंच या व्हीडिओच्या क्षणांचे संपूर्ण दृश्य खूप रोमँटिक आहे. या फोटोवर चाहते कमेंन्ट करुन चारुचं कौतुक करतानाही दिसतायेत.
हा व्हीडिओ शेअर करत चारूने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''अत्यंत थकल्यानंतर सुखदायक गरम पाण्याच्या सुकुनपेक्षा काहीही चांगलं असू शकत नाही. त्यांच्याकडे प्रत्येक या व्हिलामध्ये खासगी बाथटब आणि टेरेस आहे''.
अलीकडेच चारू असोपाने बाथटबचा आणखी काही व्हीडिओ आणि तिचे काही फोटो शेअर केले आहेत. चारु गोव्यामध्ये पती राजीवबरोबर सुट्टीवर गेली होती. यावेळी त्यांनी आपले बरेच फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हीडिओमध्ये आपण पाहू शकतो की, बाथटबमध्ये आंघोळ करताना चारू एक व्हीडिओ बनवत होती. यावोळी चारू अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसली. या व्हीडिओला चाहत्यांनी खूप पसंती दिली.