व्हिडिओ : विदेशी रेसलरने राखी सावंतला उचलून उचलून मारलं

 नाराज झालेल्या विदेशी रेसलरने राखीला उचलून उचलून आपटायला सुरूवात केली.

Updated: Nov 12, 2018, 08:08 PM IST

नवी दिल्ली : बॉलीवुड 'ड्रामा क्वीन' राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आलीयं. यावेळेस तिने कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलं नाहीयं. तर रेसलिंग फाइटमुळे ती प्रसिद्धीती आलीयं. रेसलिंगमध्ये तिने एका विदेशी रेसलरला आव्हान दिलं. ज्यानंतर राखी सावंतला हॉस्पीटलला जावं लागलं. पंचकूलाच्या ताऊ देवी लाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सीडब्ल्यूईच्या बॅनरखाली आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अनेक देसी-विदेशी रेसलर्सने सहभाग घेतला होता. या इव्हेंटचं प्रमोशन राखी सावंत आणि अर्शी खानने केलं. रविवार (11 नोव्हेंबर) एक मोठी फाइट झाली होती. 
 
 या इव्हेंटमध्ये पुरूष रेसलेरांसोबत महिला रेसलर्सही स्पर्धेत होत्या. अशाच एका स्पर्धेत एका विदेशी महिला रेसलरने खुलं आव्हान दिलं.

'जर कोणत्या भारतीय महिला रेसलरमध्ये दम असेल तर माझ्याशी फाइट करावी', असं ती म्हणाली.

हे ऐकताच राखी सावंत डान्स करत रिंगमध्ये पोहोचली आणि त्या रेसलर चॅलेंज केलं की 'माझ्या सारखा डान्स करून दाखवं.' 

 

राखीने मार खाल्ला

 या दरम्यान अनेकवेळा राखीने त्या विदेशी महिलेला चिडवून दाखवलं. नाराज झालेल्या विदेशी रेसलरने राखीला उचलून उचलून आपटायला सुरूवात केली. तिने राखीला एवढं मारलं की राखी सावंत दुखापतीमुळे व्हिव्हळायला लागली.

राखी हॉस्पीटलमध्ये  

 राखीला लागलेला मार इतका जबर होता की तिला सरळ चालताही येत नव्हत. यानंतर राखीला हॉस्पीटलला नेण्यात आलं. आता तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

राखी सावंतने सपना चौधरीसोबत ठुमकेही लगावले होते. हा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये रेसलिंग रिंगमध्ये राखी आणि सपना चौधरी डान्स करताना दिसल्या.