उरी सिनेमासाठी यामीने बदलला लूक...

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने आपल्या आगमी सिनेमा उरी साठी नवा लूक धारण केला आहे. 

Updated: Jun 5, 2018, 03:01 PM IST
उरी सिनेमासाठी यामीने बदलला लूक... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने आपल्या आगमी सिनेमा उरी साठी नवा लूक धारण केला आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी तिने तिचे मोठे केस कापून चक्क छोटे केले आहेत. व्यक्तिरेखा सत्यात उतरवण्यासाठी तिने हे पाऊल उचलले आहे. याबद्दल यामी म्हणते की, एखाद्या भूमिकेसाठी जेव्हा अनोख्या लूकची गरज असते तेव्हा मी अत्यंत उत्साहीत असते. जेव्हा आदित्यने माझ्याशी याबद्दल चर्चा केली तेव्हा मी या भूमिकेसाठी लगेचच तयार झाले. प्रेक्षकांनाही ही भूमिका आवडेल अशी आशा आहे. 

यामीने शेअर केला नवा लूक

विक्की डोनरची या अभिनेत्रीने ट्वीटरवर आपला नवा लूक शेअर केला आहे. त्यात ती लिहीते की, आयुष्य लहान आहे, प्रत्येक हेअर फ्लिप मोजा. उरी सिनेमात ती खुफिया अधिकारीची भूमिका साकारत आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा २०१६ च्या उरी हल्लावर आधारित आहे. १८ सप्टेंबर २०१६ ला पाकिस्तान आतंकवाद्यांनी जम्मू-कश्मीरच्या उरीत सैन्यावर हल्ला केला. ज्यात १९ जवान शहीद झाले. याच्या ११ दिवसांनंतर भारतीय सेनाने सर्जिकल हल्ला करुन याचा बदला घेतला. 

यामीचा अजून एक नवा सिनेमा

यामीने काही दिवसांपूर्वी बत्ती गुल मीटर चालू या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. या सिनेमात ती शाहीद कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत झळकेल. या सिनेमाचे दिग्दर्शन श्री नारायण सिंह केले असून या सिनेमाची कथा विजेवर आधारित आहे. यापूर्वी श्री नारायण सिंह यांनी टॉयलेट एक प्रेमकथा हा सिनेमा दिग्दर्शित केला होता आणि तो ही सामाजिक विषयावर भाष्य करणारा सिनेमा होता.