VIDEO : यूट्यूबवर हनी सिंहची धमाकेदार एन्ट्री

पाहा हे गाणं 

मुंबई : बॉलिवूडमध्ये धम्माल करायला पुन्हा एकदा पंजाबी सिंगर हनी सिंह एका नव्या गाण्यासह सज्ज झाला आहे. सैफ अली खानच्या 'बाजार' सिनेमातील 'बिलेनिअर' हे गाणं यू्ट्यूबवर ट्रेंड करत आहे. हे गाण 3 ऑक्टोबरच्या रात्री लाँच करण्यात आलं. रिलीज नंतर या गाण्याला लगेचच लाखो लोकांनी पाहिलं आहे. हनी सिंहने यावर्षी 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमातून पुन्हा वापसी केली आहे. 

सैफ अली खान, रोहन मेहरा आणि एली अबरामवर चित्रित झालेलं हे गाणं डिस्को थीमवर आधारित आहे. पार्टी सिझन लवकरच येणार आहे याचा विचार करून हे गाणं तयार करण्यात आलं आहे. हनी सिंहने याचा टिझर पोस्ट केला होता. आता 'बिलेनिअर' या गाण्यावर हनी सिंहने एन्ट्री केली आहे. यू ट्यूबवर हे गाणं धम्माल करत आहे. 

या अगोदर हनी सिंहने गायलेल्या 'रंगतारी' आणि 'उर्वशी' या गाण्यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला. लवरात्री या सिनेमातील रंगतारी हे गाणं असून या गाण्याने 'कन्या वेस्ट' आणि 'मारून 5' या गाण्याला मागे टाकलं आहे.