फक्त 30 मिनिटांसाठी प्रियांकाला 12 कोटींची ऑफर

सिनेमाच्या चंदेरी दुनियेत माणसाला एकदा का ग्लॅमर मिळाले की, साक्षात कुबेरच त्या व्यक्तिवर प्रसन्न होतो. बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीचेच पहा ना. प्रियांकाला केवळ 30 मिनिटांसाठी चक्क 12 कोटी रूपायांची ऑफर आली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 19, 2017, 07:08 PM IST
फक्त 30 मिनिटांसाठी प्रियांकाला 12 कोटींची ऑफर

मुंबई : सिनेमाच्या चंदेरी दुनियेत माणसाला एकदा का ग्लॅमर मिळाले की, साक्षात कुबेरच त्या व्यक्तिवर प्रसन्न होतो. बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीचेच पहा ना. प्रियांकाला केवळ 30 मिनिटांसाठी चक्क 12 कोटी रूपायांची ऑफर आली आहे.

प्रियांकाच्या फॅन फॉलोइंगवर बारीक नजर

प्रियांका सध्या आपल्या आंतरराष्ट्रीय 'क्वॉन्टिको'च्या शूटींगमध्ये भलतीच व्यग्र आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील तिचा वावर काहीसा कमी झाला आहे हे खरेच. पण, म्हणून काही तिच्या फॅन फॉलोईंगध्ये मात्र, मुळीच घट झाली नाही. उलट दिवसेंदिवस तिचे फॅन्स वाढतच चालले आहेत. तिच्या फॅन फॉलोइंगवर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री, प्रोड्युसर्स आणि इव्हेंट ऑर्गनायजर्सचेही भलतेच बारीक लक्ष असते. त्यामुळेच तर, तिच्या स्टेज परफॉर्मन्सच्या मानधनात घसघशीत रक्कम द्यायला आयोजक तयार होतात.

30 मिनीटांसाठी 12 कोटी रूपये

एका इव्हेंट ऑर्गनायजींग कंपनीने प्रियांकाला केवळ 30 मिनीटांच्या परफॉर्मन्ससाटी चक्क 12 कोटी रूपये देऊ केले आहेत. विशेष असे की, आज घडीला बॉलिवूडमधील एखादा अभिनेता किंवा अभिनेत्रीही मिनिटांवर चित्रपटासाठी इतके पैसै मागत नाही. दरम्यान, तिला कोणत्या अवॉर्ड शोसाठी ऑफर आहे हे समजू शकले नाही.

प्रियांका बॉलिवूडमध्ये कधी परतणार?

दरम्यान, प्रियांका सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत चांगले रिलेशन ठेऊन आहे. ती आता परत बॉलिवूडमध्ये कधी परतेल हे माहित नाही. पण, एखाद्या अवॉर्ड शोसाठी काही मिनिटांच्या परफॉर्मन्स बद्धल तिला 12 कोटी रूपये मानधन दिले जाऊ शकते. यावरूनच तिचा भाव किती वधारला आहे हे आपल्या लक्षात येऊ शकते.

दरम्यान, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वीच प्रियांकाने एका जाहीर कार्यक्रमात यायला नकार दिला होता. कारण, एखाद्या टॉप एक्टर्सपेक्षा कमी मानधन घ्यायला ती तयार नव्हती.