'सैफ अली खानने माझी अंडरवेअर...', अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा; मला म्हणाला 'तू नग्न...'

अभिनेते झाकीर हुसेन यांनी सैफ अली खानसह 'एक हसीना थी' चित्रपटात काम केलं आहे. यादरम्यानचा एक किस्सा त्यांनी पहिल्यांदाच शेअर केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 28, 2023, 05:27 PM IST
'सैफ अली खानने माझी अंडरवेअर...', अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा; मला म्हणाला 'तू नग्न...' title=

अभिनेते झाकीर हुसेन आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखले जातात. तसे त्यांच्या वाट्याला नेहमीच निगेटिव्ह भूमिका येतात. पण त्यांची अभियनशैली वेगळी असल्याने या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. 'सरकार', 'जॉनी गद्दार', 'सिंघम रिटर्न्स' अशा अनेक चित्रपटांमध्ये झाकीर हुसेन यांनी काम केलं आहे. दिग्दर्शक रामगोपाल वर्माच्या 'एक हसीना थी' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दरम्यान नुकतंच त्यांनी या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितलं. 

चित्रपटातील एका सीनमध्ये झाकीर हुसेन हे अंडरवेअरमध्ये असतील असं ठरलं होतं. यावेळी सैफ अली खानच्या एका कृत्याने त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 2004 मधील या क्राइम थ्रिलर 'एक हसीना थी' चित्रपटात सैफ अली खान आणि उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होते. झाकीर हुसेन यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. सैफ अली खानला उधार पैसे दिले असल्याने त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि धमकावणं अशी त्यांची भूमिका होती. 

झाकीर हुसेन यांनी नुकतीच Bollywood Thikana ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, त्यांना ट्रॅक पँट आणि टी-शर्ट घालून एका सीनचा उत्तरार्ध शूट करावा लागला होता. पण सैफ अली खानसोबतच्या शूटच्या दिवशी बरेच बदल करण्यात आले.

"एका आठवड्यानंतर जेव्हा आम्ही उर्वरित सीन शूट करणार होतो तेव्हा मी तेच कपडे घातले होते. सैफने मला पाहिल्यानंर हे चालणार नाही असं म्हणाला. या सीनमध्ये मी नग्न असावं असं त्याला वाटत होतं. सैफने मला तुमच्याकडे चांगली अंडरवेअर आहे का? अशी विचारणा केली होती. त्यावर मी त्याला आता जी मी घातली आहे तिची आहे असं सांगितलं. त्यानंतर त्याने त्याची नवी कोरी अंडरवेअर दिली. नंतर हसून परत पण कर असं म्हणाला," असा खुलासा झाकीर हुसेन यांनी केला. 

शेवटच्या क्षणी बदल झाल्याने आपला सीन दोन भागात विभागण्यात आला असं झाकीर यांनी सांगितलं. पहिला भाग सैफ अली खानसह होता आणि दुसऱ्या भागात उर्मिला माझी हत्या करते. पुढे त्यांनी सांगितलं की, अंडरवेअरमध्ये सीन करण्यास माझी काही हरकत नव्हती. पण मी आधीच अर्धा सीन शूट केला होता. ज्यामध्ये कपडे घातलेले होते. यामुळे मोठी समस्या होती. 

"मी सुचवलं की, जेव्हा सैफ येतो तेव्हा मी अंडरवेअरवर बसलेलो असतो आणि नंतर बाथरुममध्ये जाऊन कपडे घालतो असं दाखवू. जेणेकरुन दुसरा भाग जसा शूट केला आहे तसा वापरता येईल," असं झाकीर म्हणाले. पण यामुळे माझा सीन छोटा झाला असंही त्यांनी सांगितलं. "त्यामुळे माझे सर्व डायलॉग ऑफ कॅमेरा गेले. माझा चेहरा दिसताना फक्त तीन डायलॉग राहिले," असं झाकीर यांनी सांगितलं.