झी-5 हा व्हिडिओ ऑन डिमांडसाठी मोठा प्लॉटफॉर्म

मुंबईत झी-5 या डिजिटल प्लॅटफॉर्मचं लाँचिंग करण्यात आलं. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 15, 2018, 02:30 PM IST
झी-5 हा व्हिडिओ ऑन डिमांडसाठी मोठा प्लॉटफॉर्म title=

मुंबई : झी एण्टरटेंमेंट एंटरप्राईजेस लिमिटेडनं झी-5चं लाँचिंग केलं. झी-5 हा व्हिडिओ ऑन डिमांडसाठी मोठा प्लॉटफॉर्म आहे. 

मुंबईत झी-5 या डिजिटल प्लॅटफॉर्मचं लाँचिंग

झी चे आंतरराष्ट्रीय सीईओ अमित गोयंका आणि झी एंटरटेंमेंटचे सीईओ पुनीत गोयंका यांच्या हस्ते मुंबईत झी-5 या डिजिटल प्लॅटफॉर्मचं लाँचिंग करण्यात आलं. 

आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आनंद घेता येणार

झी-5च्या माध्यमातून प्रेक्षकांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. 

इंग्रजी, हिंदीसह भारतातल्या 12 भाषांमध्ये

तसंच संगीत, आरोग्य, लाईफस्टाईलचे व्हिडिओ पाहण्याची देखील झी-5च्या प्लॅटफॉर्मवर सुविधा देण्यात आली आहे. झी-5 हे इंग्रजी, हिंदीसह भारतातल्या 12 भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.