टेनिस कोर्टात आमिर खानला कुणाच्या प्रेमात पडला

बुधवारी सगळीकडे प्रेमाचा दिवस आनंदात साजरा केला जात होता. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 15, 2018, 11:42 AM IST
टेनिस कोर्टात आमिर खानला कुणाच्या प्रेमात पडला

मुंबई : बुधवारी सगळीकडे प्रेमाचा दिवस आनंदात साजरा केला जात होता. 

आणि तेव्हाच आमिर खानने 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमातील 'पहला नशा' हे गाणं शेअर करून सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. हे गाणं फक्त आमिरच्या सिनेमातील गाणं नाही तर त्याच्या आवडीचं देखील हे गाणं आहे. 

आमिर खानसाठी पहला नशा काय आहे? 

याचा खुलासा स्वतः मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने केला आहे.  आमिर खानला पहिलं प्रेम हे पहिली पत्नी रीना किंवा दुसरी पत्नी किरण खेर नाही. आमिर खानला वयाच्या 10 व्या वर्षी पहिलं प्रेम झालं. आणि ते देखील टेनिस कोर्टात. मात्र आमिर खानने त्याचं हे पहिलं प्रेम कधीच व्यक्त केलं नाही. 

काय म्हणाला आमिर खान?

 ‘मी १० वर्षांचा असताना एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. खूप कमी लोकांना हे माहित आहे. मी टेनिस क्लासला जायचो. त्यावेळी टेनिस कोचिंगमध्ये खूप मोठा ग्रूप होता. आम्ही सगळे १० वर्षांच्या वयोगटातील ४०-५० मुलं- मुली होतो. याच ग्रूपमध्ये एक मुलगी होती. तिला पाहताच मी भान हरपलो होतो. तिला पहिल्यांदा पाहिले आणि मी तिच्या प्रेमात वेडा झालो. म्हणजे, दिवसरात्र मी केवळ तिच्या अन् तिच्याबद्दल विचार करायचो. ‘पहला नशा...’ या गाण्यातील ‘उडता ही फिरूं इन हवाओं में कही...’ या ओळीसारखी माझी अवस्था होती.

ती १० वर्षांची होती आणि कमालीची सुंदर होती. तिला इम्प्रेस करण्यासाठी मी नाही नाही ते उपद्व्याप केलेत. पण अखेरपर्यंत तिला सांगण्याची हिंमत मात्र झाली नाही. क्लासमध्ये सर्वात आधी पोहोचणारा आणि सर्वात उशीरा निघणारा मी होतो. तिला इम्प्रेस करण्याच्या नादात केवळ आणि केवळ माझा गेम चांगला झाला. बाकी माझ्या मनातले मी तिला कधीच सांगू शकलो नाही. पुढे चार वर्षांत ती तिच्या कुटुंबासोबत निघून गेली. ते ‘सायलेंट लव्ह’ होते. जे कायम अधूरे राहिले.