चित्रपटात बलात्कार दाखवू शकतात पण KISS नाही! सेन्सॉर बोर्डावर संतापली जोया अख्तर

Zoya Akhtar On Not Able To Show Kiss On Screen : झोया अख्तरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 30, 2024, 12:55 PM IST
चित्रपटात बलात्कार दाखवू शकतात पण KISS नाही! सेन्सॉर बोर्डावर संतापली जोया अख्तर title=
(Photo Credit : Social Media)

Zoya Akhtar On Not Able To Show Kiss On Screen : बॉलिवूडची लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शिका जोया अख्तर ही नेहमीच तिचं मत मोकळेपणानं मांडताना दिसते. कोणत्याही गोष्टीवर तिला काही वाटत असेल तर ती स्पष्ट बोलते. आता जोया अख्तरनं चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या फिजिकल इंटिमसीवर वक्तव्य केलं आहे. जोयाचं म्हणणं आहे की फिजिकल इंटिमेसीवर सेंसरशिप असायला नको. जोयानं याचं कारण देखील सांगितलं आहे. इतकंच नाही तर समाजाच्या विचारांवर प्रश्न उपस्थित करत म्हटलं की तुम्ही मुलांना असे चित्रपट दाखवू शकतात ज्यात महिलांवर हानामारी होते आणि त्यांचा बलात्कार होतोय, पण किस दाखवू शकत नाही?

जोया ही तिचे वडील जावेद अख्तर यांच्यासोबत 'इंडियन एक्सप्रेस' च्या कार्यक्रमात पोहोचली होती. त्यावेळ सेंसरशिपवर बोलताना जोयानं म्हटलं की फिजिकल इंटिमसीवर कोणत्याही प्रकारच्या सेंसरशिपची गरज नाही. जोया म्हणाली, 'फिजिकल इंटिमसीवरून सेंसरशिप काढून टाकायली हवी. हो, जर सेंसरशिप काढून टाकण्यात येईल तर अनेक लोकं अशा अशा गोष्टी दाखवतील ज्या योग्य नाही, पण मला वाटतं की स्क्रीनवर कंसेंशुअल इंटिमसी (एकमेकांच्या सहमतीनं बनवलेले संबंध) दाखवणं खूप गरजेचं आहे. माझी इच्छा आहे की मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांनी कंसेंशुअल इंटिमसी पाहून मोठं झालं पाहिजे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

याविषयी पुढे सांगत जोया म्हणाली, 'मी ज्या चित्रपटांना पाहून मोठी झाले, त्या चित्रपटांमध्ये महिलांना धमकी देणं, मारणं, त्यांना त्रास देणं आणि बलात्कार करण्याचे सीन दाखवण्यात आले. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे मुलांना ते सीन पाहण्याची परवानगी होती, पण किस करतानाचे सीन्स पाहण्याची परवानगी नव्हती. मला वाटतं की मुलांना असे सीन्स पाहण्याची परवानगी देण्या ऐवजी दोन लोकांमध्ये असलेलं प्रेम आणि कंसेंशुअल इंटिमसीचे सीन्स दाखवण्याची परवानगी द्यायला हवी कारण हे फार महत्त्वाचं आहे.'

हेही वाचा : 'माझ्या आयुष्यात अंधार...'; 'तारक मेहता...' फेम शैलेश लोढानं शेअर केली भावूक पोस्ट

जोयाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्यात 'गली बॉय', 'दिल धडकने दो', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'लक बाय चांस' हे चित्रपट आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती.