How To Lose Weight : 28 वर्षीय सार्थक अनेजा या तरूणाने तब्बल 133 किलोपर्यंतचा आकडा वजनकाट्यावर गाठला होता. लठ्ठपणामुळे अनेकदा त्याला सुसती आणि आळस असायचा. एवढंच नव्हे तर तो कायम थोडसं काम करूनही थकायचा. वजन जास्त असल्यामुळे कपडे कोणतेच नीट होत नव्हते अनेकदा लाजीरवाण्या प्रसंगांना सार्थक सामोरे जात होता. एका पार्टीतल्या स्वतःच्या फोटोला बघून तो खूप नकारात्मक झाला आणि तेव्हाच त्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.
सार्थक चिट डे करताना आपल्या आवडीचे पदार्थ खात असे. बटर चिकन, पिझ्झा, मोमो ,चीझकेक यासारखे पदार्थ खात असे. तसेच या दिवसांतही तो 200 ग्रॅम चिकन ब्रेस्ट सॅलड, ड्रेसिंग म्हणून कमी चरबीयुक्त सॉस वापरणे यासारखे पर्याय निवडत असे.
वजन कमी करण्यासाठी तो इंटरमिटेंट फास्टिंगही करत असे.
1 तास कार्डिओ आणि 1 तास वेट ट्रेनिंग असा सार्थकचा वर्कआऊट रुटीन असे. तसेच आठवड्याच्या शेवटी तो बॅडमिंटन खेळत असे. मी नियमितपणे जेव्हा मी वर्कआउट करायला सुरुवात केली तेव्हाचे फोटो पाहतो तेव्हा मला पुन्हा असं व्हायचं नाही असं मनापासून वाटतं, असं सार्थक सांगतो. वजन कमी करण्यासाठी सतत मेहनत करणे आवश्यक आहे. एका वर्षात काय साध्य करता येईल असा प्रश्न अनेकांना पडतो पण वजन कमी करण्यासाठी सातत्य अतिशय महत्त्वाचं ठरते.
वजन कमी करताना प्रत्येकाचा डाएट वेगळा असतो तसा अनुभव देखील वेगळा असतो. त्यामुळे या डाएट प्लानवरून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता. पण आपल्या डाएट न्यूट्रिशनिस्ट व्यक्तीशी बोलून आपला डाएट प्लान ठरवावा.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
AUS
(20 ov) 181
|
VS |
SL
184/2(18 ov)
|
| Sri Lanka beat Australia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 202/7
|
VS |
ITA
178(20 ov)
|
| England beat Italy by 24 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 160/9
|
VS |
AFG
162/5(19.2 ov)
|
| Afghanistan beat United Arab Emirates by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.