अवघ्या 14 महिन्याच्या बाळावर झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

अवघ्या 14 महिन्याच्या बाळावर यशस्वी यकृत प्रत्यारोपणाची किमया नवी मुंबईत अपोलो हॉस्पिटलमध्ये घडली आहे. राम मेस्त्री नावाच्या 6.5 वजनाच्या कोवळ्या जीवाला इतक्या लहान वयातच यकृत प्रत्यारोपणासारख्या ऑपरेशनचा सामना  करावा लागला.

Dipali Nevarekar | Updated: Apr 6, 2018, 03:05 PM IST
अवघ्या 14 महिन्याच्या बाळावर झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण  title=

मुंबई : अवघ्या 14 महिन्याच्या बाळावर यशस्वी यकृत प्रत्यारोपणाची किमया नवी मुंबईत अपोलो हॉस्पिटलमध्ये घडली आहे. राम मेस्त्री नावाच्या 6.5 वजनाच्या कोवळ्या जीवाला इतक्या लहान वयातच यकृत प्रत्यारोपणासारख्या ऑपरेशनचा सामना  करावा लागला.

सर्वात लहान रूग्ण 

राम मेस्त्री हा मूळचा गुजरातचा. अवघ्या 14 महिन्याच्या या बाळला लिव्हर सिरोसिसचा त्रास होता. जन्मानंतर अवघ्या काही महिन्यातच त्याला तिसर्‍या टप्प्यातील आणि गंभीर स्वरूपातील यकृताचा आजार असल्याचे निदान झालं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने रामवर यकृत प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

एनजीओची मदत  

राम मेस्त्रीच्या कुटुंबाला मुंबईतील 'Transplants – Help the Poor' या संस्थेने आर्थिक मदत केली. रामला त्याच्या परिवारीतील मावशीने यकृतदान केले. 

 कोणता होता आजार ?  

 Biliary atresia हा नवजात बालकांमध्ये दुर्मिळ असणारा आजार रामला जडला होता. ज्यामध्ये पित्ताच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. याकरिता शस्त्रक्रियेनेच बिघाड दूर केला जाऊ शकतो.  रामला वयाच्या अगदीच सुरूवातीच्या टप्प्यावर यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय घ्यावा लागला. याकरिता त्याच्या मावशीने यकृताचा काही भाग घेण्यात आला.  

 यकृतदाना नंतरही वाढते 

 मानवी शरीरातील यकृत हाच केवळ एक असा अवयव आहे, जो दान  केल्यानंतरही शरीरात वाढू शकतो. त्यामुळे रामसाठी पुढे आलेल्या त्याच्या परिवारातील व्यक्तींच्या धैर्याचं कौतुक केलं जात आहे.