हृदयविकारापासून ते अनेक आजारांवर तीळाचे सेवनाचे हे आहेत 5 जबरदस्त फायदे

तीळाचे सेवन अनेक आजारांवर फायदेशीर ठरेल. तिळाच्या बियांमध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.

Updated: Nov 27, 2021, 11:37 PM IST
हृदयविकारापासून ते अनेक आजारांवर तीळाचे सेवनाचे हे आहेत 5 जबरदस्त फायदे title=

मुंबई : तिळाचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो, पण तुम्हाला माहित आहे का की तीळ तुमचा अनेक आजारांपासून रक्षण करते. तिळाच्या बियांमध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. हृदयविकारापासून ते अनेक आजारांवर तीळाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

तिळामध्ये सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवते. तीळाच्या नियमित सेवनाने कोलन कॅन्सर, ल्युकेमिया, फुफ्फुसाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

तणाव कमी करते

तिळातील पोषक तत्व तणाव कमी करतात. याच्या सेवनाने डिप्रेशनची समस्या कमी होते.

हृदयाचे आरोग्य

तिळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम सारखे घटक असतात. हृदयाच्या स्नायूंच्या सक्रिय कार्यासाठी हे उपयुक्त आहेत.

हाडांसाठी चांगले

तिळातील आहारातील प्रथिने आणि अमीनो अॅसिड हाडे मजबूत ठेवतात.

त्वचेसाठी फायदेशीर

तिळाच्या तेलाचे सेवन आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. याचा नियमित वापर केल्याने त्वचेचे पोषण होईल आणि तुमची त्वचा निरोगी राहील.

मासिक पाळीची समस्या

1 चमचा तीळ रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवून सकाळी गुळासोबत खावी. यामुळे मासिक पाळीची समस्या दूर होईल.