Corona : वेगाने वाढतायंत ओमिक्रॉनची प्रकरणे, जाणून घ्या काय आहेत लक्षणे

जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन प्रकार (B.1.1.529) हा चिंतेचा प्रकार (VOC) असल्याचंअवघ्या दोन दिवसांत घोषित केले आहे.

Updated: Nov 27, 2021, 08:26 PM IST
Corona : वेगाने वाढतायंत ओमिक्रॉनची प्रकरणे, जाणून घ्या काय आहेत लक्षणे title=

मुंबई : ज्याप्रमाणे जग डेल्टा (Delta virus) प्रकारातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच कोविड-19 च्या 'ओमिक्रॉन' या नवीन प्रकाराने दार ठोठावले आहे. चिंतेची बाब म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन (Omicron) प्रकार (B.1.1.529) हा चिंतेचा प्रकार (VOC) असल्याचं अवघ्या दोन दिवसांत घोषित केले आहे. डेल्टा व्हेरिएंट, ज्याने जगात सर्वात जास्त कहर केला होता, तो देखील यापूर्वी VOC म्हणून घोषित करण्यात आला होता. 24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेत (South africa) ओमिक्रॉन व्हेरिएंटचं पहिलं प्रकरण नोंदवलं गेलं होतं. त्यानंतर त्याची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.

ओमिकॉर्न वेरिएंट लक्षणे:

दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) नुसार, Omicron प्रकारात अद्याप कोणतीही असामान्य किंवा नवीन लक्षणे दिसून आलेली नाहीत. याचा अर्थ असा की ओमिक्रॉन संसर्ग देखील मागील प्रकाराप्रमाणेच लक्षणे दर्शवित आहे. उदाहरणार्थ, ताप, खोकला, वास किंवा चव कमी होणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे इत्यादी लक्षणं आहेत.

ओमिक्रॉन जुन्या प्रकारापेक्षा वेगाने पसरतोय

डब्ल्यूएचओच्या मते, कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन हे कन्सर्नच्या जुन्या प्रकारापेक्षा वेगाने पसरत आहे आणि तो त्यांच्यापेक्षा जास्त प्राणघातक ठरू शकतो. WHO च्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनची चाचणी करण्यासाठी आधीपासूनच वापरल्या जात असलेल्या पीसीआर चाचणीची मदत घेतली जात आहे. अनेक प्रयोगशाळांनी असे सूचित केले आहे की या पीसीआर चाचणीमध्ये तीन लक्ष्यित जनुकांपैकी एकही शोधला जात नाही. ज्याला एस जीन ड्रॉपआउट किंवा एस जीन टार्गेट फेल्युअर असेही म्हणतात.

ओमिक्रॉन विरुद्ध लस किंवा बूस्टर डोस प्रभावी आहेत का?

कोविड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराविरूद्ध ही लस प्रभावी आहे की नाही याबाबत लस उत्पादकांना अजूनही शंका आहे. हे शोधण्यासाठी फायझर आणि बायोएनटेक यांनी संशोधन सुरू केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओमिक्रॉनचा लस किंवा बूस्टर डोस घेतलेल्या अनेक लोकांना संसर्ग झाला आहे. दक्षिण आफ्रिकेशिवाय इतर देशांमध्येही ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.