Diabetes MeinImmunity Zaroori : सध्याच्या काळात आपण सर्व जण अजूनही कोरोनासारख्या साथीच्या रोगाशी लढा देत आहोत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत नसणं ही अधिक चिंतेची बाब ठरत आहे. रोगप्रतिकारशक्ती फार आवश्यक असते. विशेषतः डायबेटीस असेल तर याचं महत्त्व नक्कीच माहिती असेल. डायबेटीस शरीराच्या रोगप्रतिकाराच्या प्रतिसादावर परिणाम करू शकतो. त्यामुळे त्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. योग्य आहार आणि फिजिकल अॅक्टिव्हिटी हे डायबेटीस असलेली व्यक्तीच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्त्वाचे भाग ठरतात. आहाराचा विचार केल्यास, अशी अनेक शुगर-फ्री सुपरफूड्स आहेत जी योग्य रीतीने प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे डायबेटीस असलेल्या व्यक्तीही किरकोळ संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यास सक्षम होतात.
डायबेटीस असलेल्या व्यक्तीने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार निवडताना जागरूक असणं खूप महत्त्वाचं आहे. पोषण आणि कार्बच्या प्रत्येकाच्यागरजा वेगवेगळ्या असू शकतात. त्यानुसार, खालीलपैकी कोणत्याही डायबेटिक फ्रेंडली आणि रोगांशी दोन हात करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या पदार्थांचं सेवन करू शकता.
लिंबूवर्गीय फळं
सहसा सर्दी झाल्यानंतर किंवा थंडी लागत असेल तर व्हिटॅमिन सीचं सेवन केलं जातं. कारण, व्हिटॅमिन सी हे संसर्गांचा सामना करणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देतं. द्राक्ष, संत्री, टँजेरिन, लिंबू आणि मोसंबी यांसारखी लिंबूवर्गीय फळं व्हिटॅमिन सीचा स्रोत आहेत. त्यांचं सेवन उपयुक्त ठरतं. या फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा ती फायबरसह तशीच खाल्ली तर जास्त उपयुक्त ठरतात.
भोपळा
भोपळा या फळभाजीला काही ठिकाणी कद्दू असंदेखील म्हणतात. कंटाळवाणी आणि बेचव भाजी म्हणून बऱ्याचदा भोपळ्याकडे दुर्लक्ष केलं जातं; मात्र भोपळ्यामध्ये उच्च प्रतिकारशक्ती वाढवणारी ए, सी व ई ही व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. याबाबत फार कमी जणांना माहिती असते. यापैकी, व्हिटॅमिन ए हे अत्यंत दाह-विरोधी जीवनसत्त्व आहे. ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
डाबर-च्यवनप्रकाश
डाबर च्यवनप्रकाशमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म मिळतात. त्यामध्ये वरून साखर मिसळलेली नसते. च्यवनप्रकाशमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. च्यवनप्रकाश हे आवळा, अश्वगंधा, गिलोय, मुळेठी, पिंपळी यांसारख्या 41 आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या प्राचीन आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनवर आधारित आहे. हे शुगर-फ्री फॉर्म्युलेशन डायबेटीस असलेल्या व्यक्तींसाठी वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं आहे.
कांदा आणि लसूण
कांदा आणि लसूण यांमुळे जेवण अधिक चवदार बनतं. याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढतात. लसणामध्ये युनिक सल्फ्युरिक संयुगंदेखील असतात. ती शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन सिस्टीमला साह्य करतात.
अक्रोड
मेंदूचं आरोग्य आणि कार्य सुधारण्यासाठी अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही अक्रोड तितकेच फायदेशीर आहेत. अक्रोडांमधून ओमेगा 3 फॅटी अॅसिडसारखे हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई हे घटक मिळतात. हे पोषक घटक त्यांच्या दाह-विरोधी गुणधर्मांमुळे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. हृदयाचं आरोग्य आणि हेल्दी ग्लायसेमिक कंट्रोलसाठीदेखील अक्रोडाची मदत होते.
डिस्क्लेमर
च्यवनप्रकाश हे एक आयुर्वेदिक औषध आहे. डायबेटीसवर उपचार करण्यासाठी किंवा तो बरा करण्यासाठी त्याची निर्मिती केलेली नाही. वापर कसा करावा यासाठी लेबल पाहा. लेखातला संसर्ग आणि आजारांचा उल्लेख खोकला आणि सर्दीसारख्या सर्वसामान्य आजारांशी संबंधित आहे. या लेखातला कंटेंट केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे आणि त्याचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून वापर करू नये.
Disclaimer : Above mentioned article is a featured content. This article does not have journalistic/editorial involvement of IDPL, and IDPL claims no responsibility whatsoever.