या ५ टिप्ससंगे आयुष्यभर रहाल फिट!

धावपळीच्या दिनचर्येत जीमला जाण्यासाठी वेळ नसणारी अनेक लोकं आहेत.

Updated: Jun 1, 2018, 08:19 AM IST
या ५ टिप्ससंगे आयुष्यभर रहाल फिट! title=

मुंबई : धावपळीच्या दिनचर्येत जीमला जाण्यासाठी वेळ नसणारी अनेक लोकं आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही व्यायाम करणे सोडून द्याल. फिट राहण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर तुम्ही घरच्या घरी काही सोपे व्यायामप्रकार नक्कीच करू शकता. रोजच्या धावपळीत या ५ गोष्टी केल्यास आयुष्यभर फिट राहण्यास मदत होईल.

वार्मअप न चुकता करा

व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी पेशींमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी वार्मअप महत्त्वाचा आहे. वार्मअप न करता व्यायामाला सुरुवात केल्यास स्नायू दुखावू शकतात.

पाण्याची बादली

हाताला-बोटांना योग्य व्यायाम मिळण्यासाठी ही अत्यंत गरजेचे आहे. एक पाण्याची बादली तीन-चार वेळा उचला आणि ठेवा.

जिने चढणे-उतरणे

जिने चढणे-उतरणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे. महत्त्वाचे म्हणजे व्यायामात सातत्य ठेवा. नियमित व्यायाम केल्याने तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. त्याचबरोबर व्यायाम करताना अजिबात घाई करु नका. दोन व्यायामप्रकारांमध्ये पुरेसा अवधी घ्या.

दिर्घकाळ तंदुरुस्त राहण्यासाठी हे लहानसे बदल करा.

रिटायर होऊ नका

वय हा एक आकडा आहे. त्यामुळे त्याकडे पाहुन स्वस्थ बसू नका. स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय ठेवा. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. त्यामुळे शरीरात रक्तसंचार सुरळीत होईल. योगासने, ध्यान करा. 

वजन नियंत्रित ठेवा

सात्विक, संतुलित आहार घ्या. त्यामुळे अतिरिक्त वजन वाढणार नाही. आहारात पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांचा समावेश करा. मासांहार प्रिय असला तरी त्याचे प्रमाणात सेवन करा. अंड, दूध अवश्य घ्या. त्यातून शरीराला प्रोटीन्स मिळतील आणि वजन नियंत्रित राहील.

मज्जेत जगा

गंभीर, त्रस्त राहू नका. ऑफिस कलिग्स, मित्रपरिवाराशी मज्जा मस्ती करा. हसणे आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे लक्ष इतर समस्या, टेन्शनपासून दूर जाते आणि निरोगी राहण्यास मदत होते.

अनुभव शेअर करा

अनुभव शेअर करताना तुम्ही कचरता का? तर असे करु नका. तुम्हाला आलेले चांगले वाईट अनुभव इतरांसोबत शेअर करा. त्यामुळे मन हलके होईल. त्याचबरोबर आलेल्या अनुभवातून तुम्ही नवे काहीतरी शिकाल जे तुम्हाला आयुष्यभर कामी येईल.