आवळा-खोबरेल तेलाच्या हेअरपॅकने केसगळती ठेवा आटोक्यात

केवळ मुलींनच नव्हे तर लांबसड्क आणि काळ्याभोर केसांच्या मुली मुलांनाही आकर्षित करतात. 

Updated: Jun 6, 2018, 09:18 AM IST
आवळा-खोबरेल तेलाच्या हेअरपॅकने केसगळती ठेवा आटोक्यात  title=

मुंबई : केवळ मुलींनच नव्हे तर लांबसड्क आणि काळ्याभोर केसांच्या मुली मुलांनाही आकर्षित करतात. पण आजकालच्या जीवनशैलीमुळे, पोषक अहाराच्या अभावमुळे मॉईश्चरची कमतरता निर्माण होते. परिणामी केसांचे आरोग्य बिघडते. अकाली केस पांढरे होणं, केसगळती या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मग या समस्येमधून टक्कल पडण्याआधीच काही घरगुती उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. 

केसगळतीवर घरगुती उपाय 

केसगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आवळा आणि खोबरेल तेलाचे मिश्रण फायदेशीर ठरते. यामुळे केसगळती रोखण्यासोबतच केसांची चमक वाढवण्यास मदत होते. 

कसा कराल उपाय? 

वाटीभर आवळ्यच्या पावडरमध्ये दोन टेबलस्पून खोबरेल तेल मिसळा. 

या मिश्रणामध्ये एक टेबलस्पून एरंडेल तेलही मिसळा. 

उग्रपणा कमी करण्यासाठी यामध्ये 4-5 थेंब रोझमेरी इसेन्शिअल तेल मिसळा. 

हे सारे मिश्रण नीट एकत्र करून हेअर मास्क बनवा. या हेअरमास्कमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

कसा लावाल हा हेअरपॅक 

 ब्रशच्या मदतीने हा हेअरपॅक केसांवर नीट लावा.
 
 हेअरपॅक लावल्यानंतर त्यावर शॉवर कॅप लावून झाकून ठेवा. 
 
 दोन तासांनी केस स्वच्छ धुवावेत. केस धुण्यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करा.  

 कसा ठरतो  फायदेशीर ? 

 आवळ्याच्या पावडरमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे केसांचे व्हॅल्युम वाढते. 
 
 खोबरेल तेलामुळे टाळूचे पोषण होते. यामुळे शुष्क केसांना मॉईश्चर मिळते. परिणामी केसांना चमक मिळते. 
 
 हे मिश्रण व्हिटॅमिन ई, ओमेगा 6, ओमेगा 9 फॅटी अ‍ॅसिड आढळते. परिणामी केसांचे आरोग्य सुधारते. 
 
 नियमित हा हेअरपॅक आठवड्यातून दोनदा लावल्यने केसगळतीची समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.