डाएटसाठी गाजर महत्वाचं असण्याची कारणं

तुम्ही गाजर खाता का?

Updated: Nov 8, 2019, 07:23 PM IST
डाएटसाठी गाजर महत्वाचं असण्याची कारणं title=

मुंबई : तुम्ही गाजर खाता का? जर तुम्ही रोज गाजर खात असाल तर तुम्ही अनेक रोगांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत. दररोजच्या जेवण्यात गाजराचं सेवन आरोग्य स्वस्थ ठेवण्यास मदत होते.

जाणून घ्या गाजराचे फायदे -

- गाजर खाल्याने गर्भपात होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. गाजरामुळे गर्भाशयाला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो.

- गाजर खाणं केसांसाठीही फायदेशीर आहे. गाजर केस गळतीची समस्या कमी करण्यास मदत होते. तसंच केस लवकर वाढण्याचीही शक्यता असते. 

- गाजर आपल्या हृदयासाठी फायदेशीर आहे. गाजरमध्ये असलेल्या फायबर आणि पोटॅशियममुळे ऑट्रीज निरोगी राहण्यास मदत होते. एवढंच नाही तर, गाजराच्या सेवनाने हायपरटेन्शनपासूनही बचाव केला जाऊ शकतो. गाजरामुळे ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्याची शक्यता असून यामुळे हार्ट अटॅकचा धोकाही कमी होऊ शकतो.

- मिनरल्सयुक्त गाजराच्या सेवनाने हायड्रेशन नियंत्रणात राहतं. खेळादरम्यान येणाऱ्या क्रॅम्सवरही गाजर उपयोगी आहे. 

- रोज गाजराचं सेवन आपल्याला अनेक काळापर्यंत तरुण दिसण्यासाठी मदत करतं.
 
- गाजर व्हिटॅमिन ए, सी आणि बी ६ चा स्त्रोत आहे. याच्या सेवनाने ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर आणि फुफ्फुसांच्या समस्यांपासूनही बचाव होऊ शकतो. 

- लठ्ठपणाची समस्या असल्यास गाजर खाणं फायद्याचं ठरतं. गाजरातून आवश्यक व्हिटॅमिन मिळतात. वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते.

- गाजराच्या सेवनाने रक्त शुद्ध होतं. 

- गाजर दातांसाठीही उपयोगी आहे. गाजरातील व्हिटॅमिन सी हिरड्या मजबूत करण्यास मदत करते.

- गाजराच्या सेवनाने डोळ्यांचं आरोग्यही उत्तम राखलं जातं. 

  

- गारजमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे हाडं मजबूत करण्यास मदत होते. शरीराला प्रथिनांची गरज असल्यास गाजर, गाजराचा ज्यूसही घेता येऊ शकतो.

- पोटाची समस्या असल्यास गाजर खाणं फायद्याचं आहे. गाजरात भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे पोटाच्या आजारांवर आराम पडू शकतो.