मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; हवा अतिप्रदूषित, लहान मुलांना जपा

 मुंबईची (Mumbai) हवा अतिप्रदूषित (Air pollution in Mumbai) असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.  

Updated: Jan 7, 2021, 01:41 PM IST
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; हवा अतिप्रदूषित, लहान मुलांना जपा

मुंबई : मेट्रो सिटी अशी ओळख असलेल्या मुंबईची (Mumbai) हवा अतिप्रदूषित (Air pollution in Mumbai) असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे.(Mumbai's air quality is already at its worse) सलग सहाव्या दिवशी मुंबईची हवा अतिप्रदूषित ((Air pollution) झालेली दिसून आली आहे.

मुंबईतल्या हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. तापमानात घट होत असल्याने हवेतल्या धुलिकणात वाढ झालेली दिसून येत आहे. सलग 6 दिवस मुंबईची हवा प्रदूषित झालेय. वांद्रे-कुर्ला संकुलातील हवेचा दर्जा अतिशय वाईट आहे. तर भांडुप, वरळी, मालाड, अंधेरी, माझगाव, बोरीवली, चेंबूर आणि नवी मुंबईतली हवा प्रदूषित आहे.

'सफर' म्हणजेच 'सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च' या संस्थेने हवेचे निरिक्षण नोंदवले आहे. या प्रदूषित हवेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचं डॉक्टरांचं आवाहन केले आहे.

तापमानात घट झाल्याने धुलिकणातही वाढ झाली आहे. धुक्‍यांसह धुरके हवेत साठून हवेच्या दर्जाची पातळी खालावत आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर वाहनांच्या प्रमाण अत्यल्प असल्याने प्रदूषण कमी झाले होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाहनांची संख्या वाढली. परिणामी प्रदूषणात वाढ झाली आहे.

प्रदूषित शरीरात गेल्यास फुप्फुस, हृदय, नाकपुड्या आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. शिवाय श्‍वसन, तसेच त्वचाविकार असणाऱ्या लोकांनी आणि विशेषत: लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे.