बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यावर आज अँजियोप्लास्टी सर्जरी झाली. कोकिलाबेन रुग्णालयात सकाळी 6 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांच्यावर अँजियोप्लास्टीची सर्जरी करण्यात आली. आतापर्यंत अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित अनेक आरोग्याच्या समस्या समोर आल्या आहेत. पण या सगळ्या आजारांवर आणि आरोग्याच्या समस्यांवर अमिताभ बच्चन यांनी मात केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी ही सर्वात चिंतेची बाब होती. आतापर्यंत अमिताभ बच्चन यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व अपडेट जाणून घेऊया.
(हे पण वाचा - अमिताभ बच्चन यांना हृदयविकाराचा धक्का? कोकीलाबेन रुग्णालयात झाली अँजिओप्लास्टी!)
अमिताभ बच्चन यांना 2000 साली पोटदुखीचा त्रास झाला. उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर कळलं की, त्यांच्या आतड्यात समस्या निर्माण झाल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या लहान आतड्याची डायव्हर्टिकुलिटिस शस्त्रक्रिया केली. उपचारादरम्यानच अमिताभ यांना हेपेटायटीस बीमुळे लिव्हर सिरोसिस झाल्याचे समजले. या अगोदर 2012 साली अमिताभ बच्चन यांचे 75 टक्के संक्रमित यकृत शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आले होते.
कुलीच्या सेटवर झालेल्या अपघातानंतर बिग बींना रक्ताची गरज असताना रक्तदात्यांची गर्दी झाली होती. यावेळी त्यांना 60 रक्तांच्या बाटल्या चढवण्यात आल्या. घाईघाईत बिग बींना हिपॅटायटीस बी ची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त देण्यात आले. ज्यामुळे त्यांना स्वतःला संसर्ग झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हेपेटायटीस बी मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवले तेव्हा खुद्द अमिताभ बच्चन यांनी याबाबत खुलासा करण्यात आला.
अमिताभ बच्चन यांना यकृताचा त्रास होता आणि त्यांना दम्याचाही त्रास होता. ऑपरेशननंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना न्यूमोनिया झाला ज्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. बंगळुरूमध्ये उपचार केल्यानंतर त्यांना एअरबसने मुंबईत आणण्यात आले. ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले.
8 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली.
26 जुलै 1982 रोजी कुली चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन जखमी झाले होते. मार्शल आर्ट्समधील तज्ज्ञ पुनीत इस्सारने ॲक्शन सीन दरम्यान त्यांना जोरदार मुक्का मारल्याने हा अपघात झाला. पुनीत इस्सारचा यांच्या एका फाईटमुळे अमिताभ बच्चन जमिनीवर कोसळले. काही वेळाने ते उठले आणि म्हणाले की मला खूप वेदना होत आहेत.बराच काळ डॉक्टरांना हा आजार ओळखता आला नाही. अमिताभ यांची प्रकृती बिघडत होती. त्यानंतर वेल्लोरच्या डॉ. भट्ट यांना एक्स-रे अहवालात आतड्यांतील छिद्र आढळून आले आणि त्यांनी सांगितले की, अमिताभच्या पोटात झालेल्या दुखापतीमध्ये पू निर्माण होऊ लागला आहे. यानंतर त्यांच्या 1982 2 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आले.
अमिताभ बच्चन यांनी दिवाळीपूर्वीच पायाची नस कापल्याची माहिती दिली होती. त्यांच्या पायाची नस कापल्याने खूप रक्तस्त्राव झाल्याचे त्यांनी स्वतः एका ब्लॉगच्या माध्यमातून सांगितले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि टाके मारण्यात आले.
अमिताभ यांनी 2020 आणि 2022मध्ये कोविडची लागण झाली होती. एवढंच नव्हे तर अभिषेकही पॉझिटिव्ह होता. या दरम्यान ते दोन महिने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते.
2022 मध्ये 'कौन बनेगा करोडपती' 14 च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस कापली गेली होती. सेटवर स्नायूतून खूप रक्तस्त्राव झाला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
2018 च्या ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमात ॲक्शन सीन करताना त्यांना खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नव्हती मात्र त्यांना बॉडी डबल वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांनी हा सीन स्वतःच करण्याचा निर्णय घेतला.