Anti Malaria Vaccine: मोठे यश, जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार

 Anti Malaria Vaccine: जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार करण्यात यश आले आहे.  

Updated: Jul 22, 2022, 10:32 AM IST
Anti Malaria Vaccine: मोठे यश, जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार  title=

लंडन : Anti Malaria Vaccine: जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार करण्यात यश आले आहे. जगातील तीन देशांमध्ये ही लस लागू करण्याची तयारी सुरु झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगातील तीन आफ्रिकन देशांमध्ये तयार केलेली पहिली मलेरियाविरोधी लस तयार करण्याची घोषणा केली आहे. 

GlaxoSmithKline (GSK) ने बनवलेली 'Mosquirix' नावाची लस सुमारे 30 टक्के प्रभावी आहे आणि त्यासाठी 4 डोस आवश्यक आहेत. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने ही लस तयार करण्यासाठी 200 मिलियन डॉलरचा मोठा निधी दिला होता. डब्ल्यूएचओने या लसीला मलेरियाविरुद्धच्या लढ्यात ऐतिहासिक यश म्हटले आहे. मात्र, आता त्याची महागडी किंमत पाहता ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेतून फाऊंडेशनने माघार घेतली आहे. फाउंडेशनने या आठवड्यात असोसिएटेड प्रेसला सांगितले की ते यापुढे लसीसाठी निधी देणार नाही. 

गेट्स फाउंडेशन यापुढे निधी देणार नाही

गेट्स फाउंडेशनच्या (मेलिंडा अँड गेट्स फाऊंडेशन) मलेरिया कार्यक्रमांचे संचालक फिलिप वेल्खॉफ यांनी या संदर्भात परिस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले की मलेरियाच्या लसीची परिणामकारकता आम्हाला हवी होती त्यापेक्षा खूपच कमी आहे. ही लस देखील खूप महाग आहे आणि ती योग्य लोकांना पुरवणे देखील खूप आव्हानात्मक आहे. अधिकाधिक जीव वाचवायचे असतील, तर लसीची किंमत आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतील. 

वेल्खॉफ म्हणाले की, गेट्स फाऊंडेशन 'गवी' या लस प्रकल्पाला पाठिंबा देत राहील. या प्रकल्पांतर्गत घाना, केनिया आणि मलावी या तीन आफ्रिकन देशांतील लोकांना सुरुवातीला ही लस मिळणार आहे. यासाठी फाउंडेशनने सुमारे 156 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. 

या निर्णयावर शास्त्रज्ञांकडून निराशा

फाउंडेशनच्या (मेलिंडा अँड गेट्स फाऊंडेशन) या निर्णयावर काही शास्त्रज्ञांनी निराशा व्यक्त केली आहे. मलेरियामुळे लाखो आफ्रिकन मुलांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी, हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या समस्या सोडवण्याच्या भविष्यातील प्रयत्नांना कमी करु शकतो. हार्वर्ड विद्यापीठातील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. डायन विर्थ यांनी सांगितले की, गेट्स फाऊंडेशनने ही लस बाजारात आणून आपली भूमिका बजावली. आता त्याचा वापर सुनिश्चित करणे हे देश, देणगीदार आणि इतर आरोग्य संस्थांवर अवलंबून आहे.

भारतीय कंपनीला तंत्रज्ञान देण्याची योजना  

ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा संदर्भ देत क्रेग म्हणाले की, बायोटेक विकसित करत असलेली मलेरियाविरोधी लस 'मेसेंजर आरएनए' तंत्रज्ञानावर आधारित असेल, परंतु हा प्रकल्प अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मलेरियाविरोधी लसीच्या मार्गातील आणखी एक मोठा अडथळा हा उपलब्धता आहे. GSK म्हणते की ते 2028 पर्यंत दरवर्षी केवळ 15 दशलक्ष डोस तयार करु शकतात. तर डब्ल्यूएचओचा अंदाज आहे की आफ्रिकेत दरवर्षी जन्मलेल्या 25 दशलक्ष बाळांना संरक्षण देण्यासाठी दरवर्षी किमान 100 दशलक्ष लसींची आवश्यकता असेल. अशा परिस्थितीत या लसीच्या निर्मितीचे तंत्रज्ञान भारतीय औषध कंपनीला दिले जाऊ शकते. असे झाले तरी लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्यास अनेक वर्षे लागतील.