Bad Cholesterol ची लक्षणं कशी ओळखाल? तुमचा हात निरखून पहा, जर...

Bad Cholsterol Signs on Hands: हायपर ट्रायग्लिसराइडच्या पातळीपर्यंत पोहोचली तर शरीरात फॅटी डिपॉझिटचे क्लस्टर तयार होतात. त्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.

Updated: Feb 25, 2023, 11:54 AM IST
Bad Cholesterol ची लक्षणं कशी ओळखाल? तुमचा हात निरखून पहा, जर... title=
Bad cholesterol symptoms

Bad Cholesterol Signs on Hands:​ गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या अनेक समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. त्यामुळे आता योग्य वेळी योग्य ती काळजी घेणं (Health Tips) गरजेचं आहे. बॅड कोलेस्टेरॉलमुळे (bad cholesterol) हृदयविकाराचा झटका, पक्षाघात अशी जीवघेणी परिस्थिती निर्माण होते. रक्तप्रवाहात व्यत्यय जाणवू लागल्याने शरिराच्या विविध भागांवर त्याचा परिणाम दिसून येतो. अशातच तुमच्या हातावर देखील त्याचा परिणाम दिसून येतो.

Bad Cholesterol ची कारणं काय?

जास्त चरबीयुक्त जेवण खाणं, धूम्रपान करणं, मद्यपान करणं, व्यायामचा टाळाटाळ यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. तुमचं वजन वाढतच चाललं असेल तर त्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. बॅड कोलेस्ट्रॉल (Bad cholesterol) रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

LDL cholesterol लक्षणं काय?

हाता-पायाला मुंग्या येणे 

कोलेस्टेरॉल (LDL cholesterol) पातळीत वाढ झाल्याचं आणखी एक लक्षण म्हणजे बोटे आणि हातांमध्ये मुंग्या येणं. तुम्हालाही सात्त्याने हाताला किंवा पायाला मुंग्या येत असतील तर तुमची कोलेस्ट्रॉल पातळी वाढली असू शकते.

पिवळ्या आणि भगव्या रंगाचे डोळे

डोळ्याभोवती आणि काहीवेळा तळहातावर आणि खालच्या पायांच्या मागच्या भागात पिवळसर रंगाचे डाग असतात, त्याला झेंथेलास्मा (xanthelasma) म्हणतात. कॉलेस्ट्रोलचे प्रमाण जास्त असल्यास असे डाग दिसून येतात.

तळहातावर पिवळे कोलेस्टेरॉल जमा

तळहातावर पिवळे कोलेस्टेरॉल जमा होतात. हायपर ट्रायग्लिसराइडच्या पातळीपर्यंत पोहोचली तर शरीरात फॅटी डिपॉझिटचे क्लस्टर तयार होतात. त्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.

कोणती काळजी घ्याल?

आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी एक तास आवश्यक आहे. योग्य क्रियांचा जीवनशैलीत समावेश केला पाहिजे. नियमित व्यायाम करणं आणि शरीराचे वजन नियंत्रणात राखणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तेलकट पदार्थ खाणं टाळावं. त्याचे परिणाम लगेच दिसून येतात.

आणखी वाचा - Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किचनमधील 'हा' पदार्थ करेल तुमची मदत!

Cholesterol चे 2 प्रकार -

कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे पडतात. उच्च घनता लिपोप्रोटीन ज्याला एचडीएल (HDL) किंवा चांगले म्हणजे गुड कोलेस्टेरॉल असं म्हणतात तर आणि कमी घनता लिपोप्रोटीन ज्याला एलडीएल (LDL) किंवा खराब म्हणजेत बॅड कोलेस्ट्रॉल असंही म्हणतात. एचडीएल तुमच्या पेशींचं आरोग्य चांगलं ठेवतं, तर एलडीएल तुमच्या धमन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे तुमच्या हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याचबरोबर इतर आजारांचा धोका देखील वाढतो.