Belly Fat करायचंय दूर, तर चहा प्या भरपूर!

व्यायामासोबत दररोज एक कप चहा प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 

Updated: Oct 7, 2022, 08:11 AM IST
Belly Fat करायचंय दूर, तर चहा प्या भरपूर! title=

मुंबई : चहा प्यायल्याने मुलींचा रंग निखळतो असा एक सर्वसामान्य समज आहे, पण आजच्या फिटनेसच्या जमान्यात जेव्हा निरोगी राहण्यासोबतच सडपातळ दिसण्यावर भर दिला जातो तेव्हा चहादेखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो.  विशिष्ट प्रकारचा चहा पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, निरोगी, संतुलित आहार आणि व्यायामासोबत दररोज एक कप चहा प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 

अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय की, चहामध्ये असलेले काही रासायनिक घटक शरीराला चरबी शोषण्यास प्रतिबंध करतात. अभ्यासात, या काही प्रकारच्या चहाला पोटावरील चरबीसह वजन कमी करण्यासाठी वरदान मानलं गेलं.

हिरवा चहा

फिटनेस प्रेमींमध्ये ग्रीन टी ही पहिली पसंती आहे. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात कॅटेचिन असतं, एक प्रकारचा अँटी-ऑक्सिडंट. ग्रीन टी चयापचय क्रिया वाढवून ऍडिपोज टिश्यू बर्न करण्यास मदत करते. 

व्हाइट टी

हे केवळ नवीन चरबी पेशींच्या निर्मितीस प्रतिबंध करत नाही तर शरीरात उपस्थित चरबी बर्न करतं आणि ऊर्जा निर्माण करते, जी शारीरिक हालचालींसाठी उपयुक्त आहे. म्हणजेच हे फॅट बर्न करतं आणि एनर्जी बूस्टरसारखं काम करतं. हे सूर्यकिरणांमुळे त्वचेला होणारं नुकसान कमी करतं. 

ब्लॅक टी

इटालियन संशोधकांच्या मते, दररोज एक कप ब्लॅक टी निरोगी हृदयाच्या स्थितीस प्रोत्साहन देतो. यामुळे, हृदय निरोगी राहतं आणि रक्त परिसंचरण सुधारून रक्तवाहिन्यांमध्ये विस्तार होतो. ब्लॅक टीमध्ये दूध मिसळल्याने तुम्हाला हे फायदे मिळणं कठीण होतं. अशा परिस्थितीत ब्लॅक टी प्या आणि निरोगी राहा.