Weight Loss Tips: रोज 'या' पदार्थचं सेवन केल्याने Belly Fat होईल कमी

व्यायामसोबतच 'या' पदार्थाचं सेवन केल्याने Belly Fat होईल कमी, काय आहे त्या पदार्थाचं नाव वाचा  

Updated: Sep 4, 2022, 07:55 AM IST
Weight Loss Tips: रोज 'या' पदार्थचं सेवन केल्याने Belly Fat होईल कमी title=

मुंबई : धकाधकीच्या जीवन शैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. जेवणाची अनियमित वेळ आणि एका ठिकाणी बसून असलेलं काम... यामुळे Belly Fat मध्ये वाढ होते. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक मार्गांनी प्रयत्न करतो, परंतु सर्व प्रयत्न करूनही Belly Fat कमी होत नाही. आपण पाहिल्यास लक्षात येईल की हा उपाय आपल्या घरातच आहे. ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ आयुषी यादव यांनी सांगितलं की, जर आपण रोज दही सेवन केलं तर केवळ आपले वजन कमी होत नाही तर आपल्या शरीराला इतरही अनेक फायदे होतील.

दहीमुळे शरीराला होणारे फायदे (Benefits Of Eating Curd)
- दही दुधाचा पदार्थ आहे. दहीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम आणि रिबोफ्लेविन सारखे महत्वाचे पोषक घटक असतात, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

- जर तुम्ही रोज दह्याचे  (Curd) सेवन केलं तर वाढतं वजन सहज कमी करता येतं. कारण या दुग्धजन्य पदार्थात भरपूर प्रथिने असतात, ज्याद्वारे वजन कमी करणं सोपं होतं.

- दही हे दुधापासून बनवलेले पदार्थ असल्याने त्यात कॅल्शिअम असतं.  हे एक पोषक तत्व आहे, ज्यामुळे आपली हाडे मजबूत (Strong bones) करण्यास मदत होते. 

- कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे जेणेकरून रोग आणि संसर्ग टाळता येतील. दह्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यात शरीरासाठी फायदेशीर बॅक्टेरिया असतात जे आपल्याला संसर्गापासून वाचवतात. (Benefits Of Eating Curd for Weight Loss Tips and Belly Fat)

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)