'या' वेळी दूध प्यायल्यास मिळेल भरपूर ताकद? नाहीतर गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाने व्हाल हैराण

Right Time To Drink Milk : दूध पिण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत, परंतु हे सर्व फायदे तेव्हाच शक्य आहेत जेव्हा दूध योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी प्यावे. आज आम्ही तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ सांगणार आहोत.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 22, 2023, 03:28 PM IST
'या' वेळी दूध प्यायल्यास मिळेल भरपूर ताकद? नाहीतर गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाने व्हाल हैराण  title=

Perfect Time To Drink Milk :  दूध प्यायल्याने शरीराला आवश्यक ते पोषकतत्वे मिळतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. लहान मुलांना कायमच उंची वाढेल हे सांगून दूध प्यायला दिलं जातं. दूध प्रत्येकाच्याच आरोग्यासाठी फायदेशीर असते. दूध कॅल्शियमचे योग्य स्त्रोत असल्याचे सांगण्यात येते. पण अनेकांना दूध पिण्याची योग्य वेळ माहित नाही. त्यामुळे शरीराला दुधातून मिळणारे योग्य पोषकतत्व मिळत नाही. 

दूध सकाळी की रात्री किती वाजता प्यावे?

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वय आणि शरीराची रचना लक्षात घेऊन दूध पिण्याची वेळ ठरवली जाते. काही लोकांसाठी सकाळी दूध पिणे फायदेशीर ठरेल, तर काही लोकांसाठी सकाळी दूध पिल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मात्र, रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे प्रत्येकासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय जर तुमचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दूध पिऊ नये.

या लोकांसाठी दिवसा दूध पिणे फायदेशीर 

दिवसभरात दूध पिणे शरीर तयार करण्यासाठी व्यायाम करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. याचे कारण म्हणजे दुधात आढळणारे प्रथिने व्यायामानंतर स्नायू वाढण्यास मदत करतात. याशिवाय लहान मुलांनाही सकाळी दूध पाजावे. जेणेकरून त्यांना दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळू शकेल.

या लोकांनी दिवसा पिऊ नये दूध 

अधिक वय असलेल्यांनी आणि मेटाबॉलिज्म कमकुवत असलेल्या व्यक्तींनी दूधाचे सेवन करणे टाळावे, असे लोक जे फार कमी फिजिकल ऍक्टिविटी करतात त्यांनी देखील दूध पिणे टाळावे. तसेच लोकांनी म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दूध पिणे अधिक फायदेशीर असते. कारण गाईचे दूध पचण्यासाठी हलके असते. 

(वाचा - Periods दरम्यान वापरली जाणारी 'ही' गोष्ट ठरली जीवघेणी, दोन बहिणी मृत्यूच्या दाढेतून आल्या परत..)

हाडे मजबूत करतात दूध 

जर दररोज रात्री एक ग्लासभर दुधाचे सेवन केले तर शरीराला आवश्यक ते कॅल्शियम मिळते. एवढेच नव्हे तर दुधामध्ये कॅल्शियम शिवाय थायमिन देखील असते. जे हाडांना मजबूत करण्यासाठी मदत करतात. 

दातदुखीपासून आराम

दूध प्यायल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. वास्तविक, दूध कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे, जो दातांच्या समस्या टाळतो.

तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल

काही लोकांना थोडेसे कष्ट करूनही थकवा जाणवू लागतो. अशा लोकांसाठी दुधाचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही नियमितपणे दुधाचे सेवन केले तर तुम्ही दीर्घकाळ एनर्जीने परिपूर्ण राहाल. विशेषतः लहान मुलांना दूध पाजणे फार महत्वाचे आहे.