ब्लॅक कॉफीमुळे वजनात घट होते? जाणून घ्या काय आहे सत्य!

जाणून घेऊया स्थूलता टाळण्यासाठी कॉफी फायदेशीर आहे का?

Updated: May 2, 2022, 01:18 PM IST
ब्लॅक कॉफीमुळे वजनात घट होते? जाणून घ्या काय आहे सत्य! title=

मुंबई : वजन कमी करण्यासाठी बरेचजण अनेक प्रयत्न करतात. शिवाय काहींच्या म्हणण्याप्रमाणे, ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. दरम्यान ब्लॅक कॉफीबद्दल वेगवेगळी मतं आहेत. ब्लॅक कॉफीचे सेवन केल्याने वजन कमी होते असे अनेकांचे मत आहे, तर ब्लॅक कॉफीमुळे वजन कमी होत नाही असंही अनेकांचं मत आहे. चला तर मग जाणून घेऊया स्थूलता टाळण्यासाठी कॉफी फायदेशीर आहे का?

ब्लॅक कॉफीमुळे वजन कमी होतं?

ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड असतं, जे वजन कमी करण्यास मदत करतं. बहुतेक लोकांना दुधासोबत कॉफी पिण्याची सवय असते. त्याऐवजी ब्लॅक कॉफी प्यायल्यास त्याचा फायदा होईल. ब्लॅक कॉफीमुळे तुम्ही एक्टिव्ह होता आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

यावेळी तुम्ही ब्लॅक कॉफी पिताना त्यामध्ये साखरेचा समावेश करू नका. असं केल्यास जास्त फायदा होणार नाही.

ब्लॅक कॉफी पिण्याचे इतर फायदे

  • वजन कमी करण्यासोबत ब्लॅक कॉफी तुमच्या शरीरातून वाईट कोलेस्ट्रॉलची पाती कमी करते. वाईट कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो.
  • ब्लॅक कॉफी यकृतासाठी एक नैसर्गिक क्लिनजर प्रमाणे काम करते. यामुळे यकृताचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हाला ब्लॅक कॉफी पिणं फायदेशीर ठरेल.
  • एका संशोधनामध्ये असं समोर आलं होतं की, ब्लॅक कॉफी मधुमेही रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.