देशात आजपासून 18+ व्यक्तींसाठी Booster Dose; मात्र लस घेण्यासाठी एक अट

आता 18 वर्षांच्या वरील व्यक्ती खाजगी केंद्रात जाऊन बुस्टर डोस घेऊ शकतात.

Updated: Apr 10, 2022, 12:04 PM IST
देशात आजपासून 18+ व्यक्तींसाठी Booster Dose; मात्र लस घेण्यासाठी एक अट title=

मुंबई : कोरोनाचा धोका देशातून अजूनही संपलेला नाही. त्यातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE भारतात एन्ट्री झाल्याने चिंता अजून वाढली आहे. मात्र अशातच आता 18 वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच आता 18 वर्षांच्या वरील व्यक्ती खाजगी केंद्रात जाऊन बुस्टर डोस घेऊ शकतात.

बूस्टर डोस घेण्यासाठी काय आहे अट

बूस्टर डोस त्याच कंपनीचा मिळणार आहे ज्या लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळालेला आहे. शिवाय लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेल्या व्यक्ती बूस्टर डोससाठी पात्र असणार आहेत. सरकारी केंद्रांवरील पहिल्या आणि दुसऱ्या डोसशिवाय, आरोग्य सेवा कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना पूर्वीप्रमाणेच बूस्टर डोस मिळत राहणार आहे.

लसीच्या किमती केल्या कमी

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी ट्विट केलं आहे 'आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर, SII ने खाजगी रुग्णालयांसाठी COVISHIELD लसीची किंमत 600 रुपयांवरून 225 रुपये प्रति डोस कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व 18+ वयोगटांसाठी बूस्टर डोस देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं स्वागत करतो' असं पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भारत बायोटेकनेही लसीच्या किंमती कमी केल्या आहेत. भारत हायोटेकच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 'आम्ही खाजगी रुग्णालयांसाठी covaxin लसीची किंमत 1200 रुपयांवरून 225 रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.