Chapati -Bhakri : तुम्हीही चपातीऐवजी भाकरीची निवड करता? तुमच्या आरोग्यासाठी काय खाणं ठरतं फायदेशीर

Wheat Roti vs Bhakri : आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, भाकरी खाणं योग्य की चपाती? चला तर मग जाणून घेऊया भाकरी खाणं चांगलं की चपाती.

Updated: Nov 28, 2022, 05:55 PM IST
Chapati -Bhakri : तुम्हीही चपातीऐवजी भाकरीची निवड करता? तुमच्या आरोग्यासाठी काय खाणं ठरतं फायदेशीर title=

Wheat Roti vs Bhakri For Diet : भाजी, पोळी, भात तसंच डाळ हा भारतीयांचा (Indian Food) नेहमीचा आहार आहे. मात्र भारताच्या वेगवेगळ्या भागात भिन्न प्रकारचा आहार घेतला जातो. यामध्ये देशाच्या कोणत्या भागात गव्हाची पोळी (Chapati) तर कुठे मैद्याची पोळी, तर दुसरीकडे आहारात भाकरीही (Bhakri) खाल्ली जाते. यापूर्वी आपल्या राज्यामध्ये आहारामध्ये (Diet) सर्वाधिक भाकरीचा समावेश केला जात होता. मात्र कालांतराने आता पोळी खाल्ली जाते. 

मात्र आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, भाकरी खाणं योग्य की चपाती? चला तर मग जाणून घेऊया भाकरी खाणं चांगलं की चपाती.

ज्वारी बाजरी पासून बनलेल्या भाकऱ्या या पोळी पेक्षा जास्त पौष्टिक मानल्या जातात. मुख्य म्हणजे गहू हा पित्तकरी आहे. तर ज्वारी आणि बाजरीमध्ये क्षार असतात त्यामुळे आरोग्यासाठी भाकरी अधिक चांगलं असतं. त्याचप्रमाणे चपातीमध्ये साखरेचं प्रमाण ज्वारी-बाजरी पेक्षा अधिक असतं. त्यामुळेच मधुमेहाच्या रूग्णांना डॉक्टर चपाती ऐवजी भाकरी खाण्याचा सल्ला देतात.

देशाच्या विविध भागात बाजरी, ज्वारी आणि नाचणी यांच्या भाकऱ्यांचा समावेश केला जातो. चला तर मग जाणून कोणत्या भाकऱ्यांचा आहारात समावेश करावा.  

  • ज्वारीचे भाकरी खाल्ल्याने काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होण्याची शक्यता असते. याचप्रमाणे ज्वारीच्या भाकरीने तुमच्या रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
  • नाचणीच्या भाकरीमद्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं. यामुळे तुमची हाडं मजबूत होण्यास मदत होतात. याशिवाय तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यासही मदत होते. यामुळे तुमच्या आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश जरूर करावा. 
  • बाजरीमध्ये ओमेगा-3 हा घटक असतो. या घटकामुळे हृदयाशी संबंधित आजार तसंच मधुमेह आणि संधिवात हे आजार दूर होऊ शकतात. बाजरीची भाकरी खाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

विविध धान्यांची भाकरी (Multigrain bhakri)

काही प्रमाणात तांदुळ आणि सम प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी घेऊन तुम्ही या धान्यांचं एक पीठ तयार करू शकता. या पीठामध्ये तुम्ही सोयाबिनचे दाणेही दळताना मिसळू शकता. मिश्र धान्यांच्या पीठाची भाकरी पचनक्रिया सुरळीत करते, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार दूर ठेवते. 

ओट्सची भाकरी (Oats bhakri)

गेल्या काही वर्षांमध्ये ओट्स खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण, त्यात नाकं मुरडणारेही कमी नाहीत. त्यामुळं तुम्ही ओट्स बारीक दळून त्याच्या पिठापासून भाकरीही तयार करु शकता. यामुळं चयापचय क्रिया सुरळीत राहते.