वजन घटवण्यासाठी फायदेशीर केवळ 1 रूपयाची 'ही' वस्तू

आजकाल लठठपणा ही समस्या सर्रास सार्‍यांमध्ये आढळते. 

Updated: Jun 12, 2018, 03:16 PM IST
वजन घटवण्यासाठी फायदेशीर  केवळ 1 रूपयाची 'ही' वस्तू  title=

मुंबई : आजकाल लठठपणा ही समस्या सर्रास सार्‍यांमध्ये आढळते. वजन घटवण्यासाठी अनेकजण विविध पर्यायांचा वापर करतात. डाएट, व्यायान, जीममध्ये घाम गाळतात. मात्र चालणं हा एक उत्ताम व्यायाम समजला जातो. मात्र चालताना एका खास गोष्टीची मदत घेतल्यास वजन घटवण्यास मदत होते. झोपण्यापूर्वीच्या या '5' चुकांंमुळे आटोक्याबाहेर जातयं तुमचं वजन

कसे घटवाल वजन ? 

वजन घटवण्यासाठी तुम्ही च्युईंग गम चघळल्यास वजन घटवण्यास मदत होते. जपानमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, चालताना च्युईंग गम चघळल्याने वेगाने वजन घटवण्यास मदत होते. 

काय आहे दावा ?

शोधामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार च्युईंग गम खाऊन व्यायाम केल्याने हृद्याचे ठोके वाढतात. यामुळे कॅलेरी कमी होण्यास मदत होते. परिणामी वजन घटवण्यास मदत होते. 

संशोधकांनी 21ते 69 वयोगटातील 46 लोकांना च्युईंग गम खाऊन फिरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या 46 लोकांचे वजन कमी होण्यास मदत झाली. या प्रकारामुळे कोणताही दुष्परिणाम दिसून आलेला नाही.