Bad Cholesterol आणि मधुमेहासाठी 'हे' फळं अमृत! हाडांसाठीही आहे वरदान

Cholesterol-Diabetes Remedy : उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहापर्यंत अनेक आजारांसाठी हे चिंचेसारख दिसणार फळं अतिशय फायदेशीर ठरतं. आयुर्वेदात ही जिलेबी अनेक रोगांसाठी वरदान ठरते असं मानलं जातं.   

नेहा चौधरी | Updated: Jun 13, 2024, 03:12 PM IST
Bad Cholesterol आणि मधुमेहासाठी 'हे' फळं अमृत! हाडांसाठीही आहे वरदान  title=

Cholesterol-Diabetes Remedy : उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. तर आज अनेकांना मधुमेहानेदेखील ग्रासलंय. अशापरिस्थितीत शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरीची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुर्वेदात सांगण्यात आलंय. चिंचेसारखी दिसणारी अशी जिलेबी ही आयुर्वेदात खूप फायदेशीर ठरते. जिलेबीच्या सेवनाने  साखरेसह शिरामध्ये जमा झालेली चरबी वितळेल आणि शरीरातून काढण्यास मदत करते. 

या जिलेबीला जंगल जिलेबी असं म्हटलं जातं. हे फळ चवीला गोड आणि तोंडात विरघळते पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. जंगल जलेबीमध्ये हे पोषक घटक असून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी1, बी2, बी3, व्हिटॅमिन के, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, आहारातील फायबर, सोडियम आणि व्हिटॅमिन ए असे अनेक प्रकारचे पोषक घटक या इवल्याशा फळामध्ये मिळतात. 
 

रक्तातील साखर नियंत्रणात फायदेशीर 

डायबिटीजच्या रुग्णांसाठी जंगली जिलेबी खूप फायदेशीर मानली जाते. जंगल जिलेबी या फळामध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म असल्याने तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करते. याशिवाय यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते.

खराब कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर

हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी जिलेबी शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. असे केल्याने तुम्ही हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या हृदयविकारांपासून स्वतःचा बचाव मदत करते. अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध, हे फळ जळजळ कमी करण्यास, खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास फायदेशीर ठरते.

हेसुद्धा वाचा - लैंगिक समस्येवर नाही तर मेंदूच्या नसासाठीही व्हायग्रा फायदेशीर! 'या' आजाराचा धोका होतो कमी, संशोधकांचा दावा

'या' समस्यांमध्येही फायदा होतो 

व्हिटॅमिन सीने समृद्ध असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. याच सेवन पोटाशी संबंधित आजारांमध्ये फायदेशीर असून हे पचन आणि शोषण मजबूत करण्यास फायदेशीर आहे. तर जर तुमची हाडे कमकुवत असतील तर तुम्ही या फळाचे सेवन केलं पाहिजे असं आयुर्वेदात सांगण्यात आलाय. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुमची कमकुवत हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)