बाप्पाच्या आरतीला टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्यास होणार 'हे' फायदे

कोणतीही चांगली बातमी कानावर आली, वाढदिवस असेल तर टाळ्यांचा कडकडात हमखास होतो.

Updated: Aug 19, 2019, 07:38 PM IST
बाप्पाच्या आरतीला टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्यास होणार 'हे' फायदे  title=

मुंबई : कोणतीही चांगली बातमी कानावर आली, वाढदिवस असेल तर टाळ्यांचा कडकडात हमखास होतो. त्याचप्रमाणे सर्वांना आता बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. गणपतीमध्ये सर्वात जास्त आकर्षनाचा विषय असतो, तो म्हणजे घरा-घरामध्ये विराजमान झालेल्या बाप्पाच्या आरतीचा. आरतीमध्ये टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात. अॅक्युप्रेशरच्या सिद्धांतानुसार मनुष्याच्या तळव्यावर त्याच्या संपूर्ण शरीराच्या अवयवांचे दबाव बिंदू असतात. जे दाबल्यानं संबंधीत अवयवांपर्यंत रक्त आणि ऑक्सीजनचा पुरवठा योग्य रित्या होतो

टाळ्या वाजविण्याचे फायदे :- 

- पाठदुखी, मानदुखी आणि सांधेदुखीपासून सुटका मिळते.

- टाळ्या वाजवल्याने सांधीवात रोगापासून बचाव केला जाऊ शकतो.

- रक्तदाब कमी असणाऱ्यांना सुद्धा टाळ्या वाजवल्या मुळे अत्यंत फायदो होतो.

- पचनक्रियेसंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. 

- टाळ्या वाजवल्याने मुलांचा मेंदु आणखी चांगलं काम करतो.

- शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी ही थेरपी फायद्याची आहे.