मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये आणि प्रामुख्याने किनारपट्टीच्या परिसरात राहणार्या समाजामाध्ये नारळाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. आहारात नारळ असावा का? याबाबत अनेक समज -गैरसमज आहेत. नारळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी नारळाचा अधिक फायदा होतो. टाळूचं आरोग्य जपण्यासाठी, केसांना नैसर्गिकरित्या चमक आणि मजबुती देण्यासाठी तसेच केसगळतीची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी नारळ फायदेशीर आहे हे तुम्हांला ठाऊक आहे.
केसगळतीचा त्रास आजकाल आबालवृद्धांमध्ये हमखास आढळतो. मग यावर मात करायची असेल तर नारळाचं दूध तुम्हांला फायदेशीर ठरू शकतं. केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत
नारळाची मलई आणि दूध केसांसाठी फायदेशीर आहे. टाळूचं पोषण करण्यासोबत नारळाच्या दूधातील प्रोटीन्स घटक, फॅट्स, मिनरल्स केसांना अधिक मजबूत करतात. नारळाच्या दूधामुळे केस मूळासकट मजबूत होण्यास मदत होते. परिणामी केसगळतीवर त्याचा गुणकारी उपाय म्हणून समावेश करणं उपयोगी ठरते.
नारळाच्या मलईसह थोडं दूध घ्या. या मिश्रणाचा टाळूवर मसाज करा. तासभर हे मिश्रण टाळूवर तसेच ठेवा. त्यानंतर मिल्क शाम्पूचा किंवा सौम्य शाम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवावेत. दर पंधरा दिवसांनी हा उपाय करणं केसगळती रोखण्यासाठी तसेच टाळूचं आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. नारळाच्या दूधासोबत या ५ आयुर्वेदीक उपायांनी केसगळतीच्या समस्येवर करा मात! सोबतच जाणून घ्या केसगळती रोखण्यासाठी कसा असावा आहार?