Questions related to Sex : भारत सर्वच क्षेत्रात जगभरात स्वतःचा झेंडा रोवतोय. पण आपल्याच देशात आजही लैंगिक आरोग्याबाबत महिला उघडपणे बोलू शकत नाही. बरं ज्या महिला याबाबत सस्पष्टपणे बोलतात त्यांना भविष्यात विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशात प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे महिलांच्या लैंगिक आरोग्याचा. म्हणूनच तुमच्या गायनॅकने जर तुम्हला 'हे' प्रश्न विचारले तर अजिबात लाजू नका.
Reproductive health शी संबंधित तक्रारींसाठी महिलांना कायम गायनॅककडे जाऊन रुटीन चेकअप करावा लागतो. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्या गायनॅकला आपल्या लैंगिक समस्या सांगण्यास लाजतात. अनेक महिला आपल्या इंटिमेट हेल्थ संबंधित शंका, समस्या स्वतःच्या गायनॅकसोबतही शेअर करत नाहीत. मात्र असं केल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
हेही वाचा - केवळ सिगारेट आणि चुकीची लाईफस्टाईल नव्हे, 'यानेही' वाढतो कॅन्सरचा धोका
तुमच्या गायनॅकचा हा प्रश्न तुम्हाला अगदीच बकवास वाटू शकतो. मात्र याच प्रश्नाच्या उत्तरावरून तुम्ही नेमक्या कोणत्या टेस्ट कराव्यात, कोणत्या करू नये हे डॉक्टर ठरवत असतात.
या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी महिला कचरतात. जर तुम्ही 15 वर्षांपासून एकाच पार्टनरसोबत असाल, तर डॉक्टर तुम्हाला STD ची टेस्ट न करायचा सल्ला देऊ शकतात. मात्र तुम्ही एकाच महिन्यात तीन वेगवेगळ्या पार्टनर्ससोबत शारीरिक संबंध ठेवले असतील, तर तुम्हला STD ही टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात.
महिलांच्या मासिक पाळीची सायकल 28 दिवसांची असते. डेटच्या तीन ते चार दिवस मागे पुढे मासिक पाळी येणं नॉर्मल असतं. मात्र ही गॅप जास्त असेल तर मात्र ही चिंतेची बाब होऊ शकते. मासिक पाळी नियमित न येणं हे गंभीर असू शकतं. असं असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
सेक्स करताना किंवा त्यानंतर तुम्हाला पेल्व्हिसमध्ये दुखत असल्यास घाबरण्याचं कारण नाही. मात्र, वारंवार असं होत असल्यास त्वरित गायनॅकशी संपर्क साधा. यासाठी सुरुवातीला डॉक्टर तुम्हाला बेसिक वजायन इन्फेक्शन टेस्ट करायचा सल्ला देऊ शकतात.
अनेक महिला या प्रश्नाचं उत्तर देण्यासही टाळाटाळ करतात. अनेकदा डॉक्टर्स हा प्रश्न विचारणं टाळतातही. मात्र तुमच्या वजायनल डिस्चार्जचा रंग किंवा वास अचानक बदलला तर तातडीने डॉक्टरांना याबाबत माहिती देणं गरजेचं आहे. ही बॅक्टेरियल इंफेक्शनची लक्षणं असू शकतात. याचा इलाज फार सोपा असतो. मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
तुमच्या गायनॅकनी तुम्हला बर्थ कंट्रोलबाबतच्या योग्य पद्धती सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमचा गायनॅक तसं नसेल करत तर तुम्ही स्वतःहून डॉक्टरांना याबाबत विचारणा केली पाहिजे. याबाबत डॉक्टरांशी चर्चा केल्याने तुम्हाला सुटेबल बर्थ कंट्रोल पद्धती कोणती, हे समजू शकेल.
प्रत्येक स्त्रीने त्यांच्या वक्षांची सेल्फ चेकिंग करणं गरजेचं असतं. असं तुम्हला सांगणं ही देखील डॉक्टरांची जबाबदारी असते. योग्य पद्धतीने कसं चेकिंग करायला हवं याबाबत डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)
common questions that gynaecologist asks to women SB