सतत हेडफोन्सचा वापर आरोग्यास घातक

मोबाईलला जोड असते ती म्हणजे हेडफोन्सची.

Updated: Aug 20, 2019, 04:31 PM IST
सतत हेडफोन्सचा वापर आरोग्यास घातक

मुंबई | आजच्या बदलत्या जीवनशैलीच्या जगात मोबाईल काळाची गरज बनला आहे. त्याशिवाय दिवस प्रत्येकाला अर्धा वाटतो. लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल तासंतास वेळ व्यतीत करतात. विशेष म्हणजे मोबाईलला जोड असते ती म्हणजे हेडफोन्सची. बाजारात सध्या अनेक प्रकारचे हेडफोन्स उपलब्ध आहेत. आणि अशा हेडफोन्सची क्रेझ तरूणांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे. पण हे हेडफोन्स आपल्या आरोग्यास अत्यंत घातक असतात. त्यामुळे हेडफोन्सचा वापर फक्त कामापूरता करण्याचा सल्ला डॉक्टर देखील देतात. 

मोबाईलमध्‍येही आवाज वाढवताना एक नोटीफिकेशन येते की, यापेक्षा आवाज वाढवल्‍यास कानांचे नुकसान होऊ शकते. त्‍यामुळे या नोटीफिकेशनकडे दुर्लक्ष करु नका. त्‍यापेक्षा जास्‍त आवाज वाढवू नका. अन्‍यथा लवकरच तुमची ऐकण्‍याची क्षमता कमी होऊ शकते. ९० डेसिबलपेक्षा जास्‍त आवाज ऐकणे कानांसाठी हानिकारक असते.

त्याचप्रमाणे आपले हेडफोन्स कोणासोबतही शेअर करू नका त्यामुळे दुस-या व्‍यक्‍तीकडून होणा-या आजारांचे संक्रमण थांबवता येते. दुस-याचे हेडफोन घेण्‍याशिवाय कोणताच पर्याय उपलब्‍ध नसेल तर ते हेडफोन आधी नीट स्‍वच्‍छ करावे मगच कानात घालावे. 

हेडफोनची सवय लागल्यमुळे ही सवय फार मोठया आजाराला सुद्धा आमंत्रण देवू शकते. काही जणांना हेडफोनचे व्‍यसनच लागते. हेडफोन लावले नाही तर त्‍यांचे डोके दुखायला लागते. सततच्‍या हेडफोनमुळे त्‍यांना लहानलहान आवाज ऐकू येणे बंद होते. त्यामुळे हेडफोनचा वापर फक्त कामासाठी करणे गरजेचे आहे.