Corona virus : कोरोनाबाधित होम क्वारंटाईन असताना इतरांनी नेमकी काळजी कशी घ्यावी?

होम आयसोेलेशनमध्ये असणाऱ्या कोरोनाबाधिताची कशी काळजी घ्याल 

Updated: Apr 24, 2021, 05:58 PM IST
Corona virus : कोरोनाबाधित होम क्वारंटाईन असताना इतरांनी नेमकी काळजी कशी घ्यावी? title=

मुंबई : कोरोना संक्रमणाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांना डॉक्टर होम क्वारंटाईन राहून उपचार घेण्याचा सल्ला देत आहे. होम आयसोलेशनमध्ये रूग्णाची सेवा करणाऱ्या व्यक्तीवर अधिक जबाबदारी असते. कोरोनाबाधित रूग्णाची काळजी घेण्यासोबतच त्यांना स्वतःची काळजी देखील घ्यायची असते. CDC ने होम आयसोलेशन रूग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना काही गाईडलाईन दिली आहे. 

१. कोरोनाबाधितांची काळजी घेत असताना डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या गोष्टी पाळणं अत्यंत महत्वाचं असतं. यासोबतच डॉक्टर आणि रूग्ण यांच्यामधील ही व्यक्ती दुवा असते. त्यामुळे त्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. कोरोनाबाधित रूग्णाला एक आठवड्यांनी बरं वाटू लागतं. 

२. कोरोनाबाधिताची काळजी घेत असताना त्याला हलकं अन्न खायला द्यावं. याकाळात रूग्णाला आरामाची अत्यंत गरज असते. घरी कोरोनाबाधित असेल तर सामान ऑनलाइन मागणंच गरजेचं आहे. 

३. कोरोनाबाधितांची काळजी घेताना नियम काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे रूग्ण किंवा त्यांच्या पाळीव प्राण्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. 

४. गंभीर लक्षणांवर ठेवा नजर : कोरोनाबाधितांच्या लक्षणांवर नजर ठेवा. जर कोरोनाबाधितांना श्वास घेण्यास त्रास होत असेल. छातीत दुखत असेल, अंथरूणातून उठणं त्यांना शक्य होत नसेल तर ही गंभीर बाब आहे. याकडे नक्की लक्ष द्या. 

५. स्वतःची अशी घ्या - कोरोनाबाधिताच्या शरीराशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्या. रूग्ण आणि तुमच्यात जवळपास ६ फूटांचं अंतर गरजेचं आहे.