ज्या देशातून कोरोना पसरला तिथूनच आली समाधानकारक बातमी

नॅशनल हेल्थ कमिशनने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. 

Updated: Mar 6, 2020, 05:14 PM IST
ज्या देशातून कोरोना पसरला तिथूनच आली समाधानकारक बातमी  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : चीनमधून एक समाधानकारक बातमी समोर आली आहे. चीनमध्ये (china) कोरोना व्हायरसमुळे (Corona virus)संसर्गग्रस्त झालेल्या १,६८१ रुग्णांना (Patients) उपचारानंतर, पूर्णपणे बरे झाल्यानंतर गुरुवारी रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. नॅशनल हेल्थ कमिशनने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. 

नॅशनल हेल्थ कमिशनने दिलेल्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत ५३,७२६ रुग्णांना गुरुवारपर्यंत उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सिन्हुआ या वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरस संसर्गाची जवळपास ८०,५५२ प्रकरणं समोर आली. तर कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत ३,०४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

१४३ नवीन प्रकरणं -

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची १४३ नवीन प्रकरणं समोर आली. त्यापैकी गुरुवारपर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला. चायना हेल्थ ऑथोरिटीने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. वृत्तसंस्था सिन्हुआने नॅशनल हेल्थ कमिशननुसार, मृत्यू झालेल्यांपैकी २९ रुग्ण हुबेई तर एक हैनान प्रांतातून असल्याची माहिती दिली.

जगभरात कोरोना व्हायरसची २,२४१ नवीन प्रकरणं -

WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृत आकड्यांनुसार, जगभरात गुरुवारपर्यंत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची २,२४१ नवीन प्रकरणं समोर आली. यानंतर कोरोना संसर्गग्रस्त लोकांची संख्या ९५,३३३ इतकी झाली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस एडहानोम गेब्रेयेसस यांनी बुधवारी, कोरोना व्हायरसचा परिणाम कमी करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन राबविण्याच्या गरजेवर जोर देण्यात आला. साऱ्या जगात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण करणाऱ्या Corona व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैद्यकिय क्षेत्रात अनेक प्रयत्न सुरु आहेत. अनेक देशांमध्ये काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. 

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्दी- खोलका असल्यास त्याची योग्य ती काळजी घेत उपचार करणं, वारंवार हात स्वच्छ धुणं, टिश्यू पेपरची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं असे प्राथमिक उपाय सुचवण्यात आले आहेत. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतं हॅन्ड सॅनिटायझर वापराल?