साखरपुड्यानंतर दोघांनी ठेवले शारीरिक संबंध; त्यानंतर तरूणीचा मृत्यू

 साखरपुड्यानंतर होणाऱ्या बायकोसोबत शरीर संबंध ठेवणं जोडप्याला फार महागात पडलंय. दोघांनी शारीरिक संबंध ठेवल्याने तरूणीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामुळे तिला स्वतःचा जीवही गमवावा लागला आहे. भोपाळच्या कोलार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Updated: Sep 18, 2021, 10:06 AM IST
साखरपुड्यानंतर दोघांनी ठेवले शारीरिक संबंध; त्यानंतर तरूणीचा मृत्यू

भोपाळ : साखरपुड्यानंतर होणाऱ्या बायकोसोबत शरीर संबंध ठेवणं जोडप्याला फार महागात पडलंय. दोघांनी शारीरिक संबंध ठेवल्याने तरूणीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामुळे तिला स्वतःचा जीवही गमवावा लागला आहे. भोपाळच्या कोलार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

दरम्यान मरण्यापूर्वी, मुलीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याविरोधात निवेदन दिलं नाही. परंतु मृत्यूचं प्रकरण असल्याने पोलिसांनी तरूणाला आपल्या ताब्यात ठेवलं आहे. या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचा साखरपुडा झाला होता. लवकरच दोघांचं लग्न होणार होतं. यापूर्वीच तरुणाने हॉटेलमध्ये एक खोली बुक करून तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर तरूणीला अधिक प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. त्रास होत असल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र यावेळी डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रूग्णालयात हलवण्यास सांगितलं. डॉक्टरांच्या अनेक प्रयत्नानंतरही तरूणीचा रक्तस्त्राव थांबला नाही. या कारणामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आला.

भोपाळचे एएसपी अंकित जयस्वाल म्हणाले की, या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. मृत्यूपूर्वी मुलीने त्या तरुणाच्या  त्याच्याविरुद्ध कोणतंही वक्तव्य केलं नाही. दोघेही बालिग आहेत. तरीही पोलीस या प्रकरणाशी संबंधित मुद्द्यांवर तपास करत आहेत. या तपासात कोणताही मुद्दा सोडला जाणार नाही. कारण प्रकरण गंभीर आहे.