पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी पुढील आठवड्यापासून कोविशील्ड लसीचे उत्पादन किमान 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुनावाला यांनी सांगितलं की, केंद्र सरकारकडून अजून कोणती ऑर्डर आलेली नाही.
अदार पुनावाला यांच्या सांगण्यानुसार, आम्ही आफ्रिकेच्या विविध लोकांच्या संपर्कात आहोत. आम्ही Kovax द्वारे 400-500 दशलक्ष डोसच्या ऑर्डरचं समीक्षा केली आहे. अमेरिकेने लसीच्या डोससाठी मोठी देणगी दिली आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत.
ते म्हणाले की, जर देशाला मोठ्या प्रमाणात स्टॉकची आवश्यकता असेल तर त्यांना अतिरिक्त साठा ठेवायला आवडेल. 'आशा आहे की असं कधीच होणार नाही, पण मला अशी परिस्थिती नको आहे की आम्ही पुढील 6 महिन्यांत लस उपलब्ध करू शकणार नाही.
त्यांनी असंही सांगितलं की, ते स्पुतनिक लाइट लसीचे 20-30 दशलक्ष डोस साठवतील आणि जास्त जोखीम घेणार नाहीत. परवाना मिळताच आम्ही जास्त दराने उत्पादन करू शकतो.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या उद्रेकामुळे सध्या उपलब्ध असलेल्या लसींच्या परिणामावर, पूनावाला म्हणाले की, "भारतीय तज्ज्ञांनी सुरक्षेची पातळी खूप चांगली असल्याचं मानलं जातंय. लॅन्सेटच्या मते, अॅस्ट्राझेनाका विषाणूविरूद्ध 80% प्रभावी आहे."