सावधान! यावेळी चुकूनही खाऊ नये दही

दही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ती योग्य वेळी खाली गेली तर. कारण आयुर्वेदानुसार दही अयोग्य वेळी खाल्यास त्रास होऊ शकतो.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 4, 2018, 04:56 PM IST
सावधान! यावेळी चुकूनही खाऊ नये दही title=

मुंबई : दही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ती योग्य वेळी खाली गेली तर. कारण आयुर्वेदानुसार दही अयोग्य वेळी खाल्यास त्रास होऊ शकतो.

रात्रीच्या वेळी दही खाल्याने शरीरात कफ होण्याची शक्यता असते. रात्री दही खाल्याने पोटाचे विकार देखील वाढू शकतात. रात्री दही खाल्याने फूड पॉयजन होऊ शकतं.

रात्री दही खाल्याने पचन क्रियेत गडबड होऊ शकते. याला पचवण्यासाठी एनर्जी बर्न करण्याची आवश्यकता असते. रात्री लोकं जेवल्यानंतर झोपतात. त्यामुळे याचा त्रास होऊ शकतो. शरीरात जर कुठे सूज असेल तर दही खाऊ नये कारण यामुळे आणखी सूज वाढू शकते.

रात्री दही खाल्याने शरीरात इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे खोकला येऊ शकतो. गाठ किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर रात्री दहीचं सेवन करु नये. दही टेस्‍टमध्ये आंबट असल्याने पचवण्यात जास्त वेळ लागतो. थंडीत देखील दही खाण्यापासून वाचले पाहिजे.

कधी आहे योग्य वेळ

दही खाण्यासाठी सकाळची वेळ चांगली असते. सकाळी नाश्ता करतांना दही खाल्याने फायदा होतो. पोटाचा विकार असलेल्या व्यक्तींनी दही पेक्षा ताक किंवा लस्सी फायदेशीर ठरु शकते.