मुंबई : हिवाळ्याच्या दिवसामध्ये भूक लागण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच बाजारातही अनेक ताज्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने खवय्यांची चंगळ असते.
हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही अनेक विविध पदर्थांची चव चाखू शकता. मग केवळ भाज्यांच्या किंवा नेहमीच्या जेवणाच्या पदार्थांमध्येच का अशाप्रकारच्या पदार्थांची निवड करावी ? म्हणूनच काही गोडाच्या पदार्थांचाही आहारात समावेश करा.
गोडाच्या पदार्थातील साखर शरीरात तात्काळ उर्जा निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे मरगळ कमी होण्यास मदत होते.
डिंकाचा लाडू हिवाळ्यात अवेळी लागणार्या भूकेवर एक हेल्थी पर्याय आहे. डिंकाच्या लाडवामध्ये तळलेला डिंक, सुकामेवा आणि गोडासाठी साखरेऐवजी गूळ किंवा खजूर मिसळू शकता. यामुळे मधूमेहींनादेखील फायदेशीर आहे.
तांदळाची खीर ही आरोग्याला पोषक आहे. त्यामध्ये साखरेऐवजी खजूर,गूळ वापरा म्हणजे तुम्ही त्यामधील गोडवा नैसर्गिकरित्या वाढवू शकाल. तसेच याचा फायदा मधूमेहींनादेखील होऊ शकतो.
हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीरात स्निग्धता वाढवण्यासाठी तीळ फायदेशीर आहे. त्यामुळे हिवाळ्यात अवश्य मकरसंक्रातीच्या सणाला तीळाच्या लाडवाचा समावेश करा.
गाजराचा हलवा आरोग्याला अधिक फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे यंदा लाल चुटूक गाजर मिळाल्यास त्याचा आहारात अवश्य समावेश करावा.