diabetes: शुगर वाढली कि पायात दिसतात ही लक्षणं..आजच व्हा सावध !

जेव्हा रुग्णाला पायाचे दुखणे अनुभवता येत नाही, तेव्हा त्या रुग्णाला पायाला झालेली इजा...

Updated: Oct 31, 2022, 03:08 PM IST
diabetes: शुगर वाढली कि पायात दिसतात ही लक्षणं..आजच व्हा सावध ! title=

diabetes symptoms in feet: मधुमेह हि आजकाल जगभरात सर्वात मोठी समस्या बनली आहे. जगभरातील बरेच लोक मधुमेह सारख्या आजारांनी त्रस्त आहेत. रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं कि मधुमेहाचा त्रास सुरु होतो. आणि या त्रासासोबत अनेक इतर समस्या उदभवतात. 
पण तुम्हाला माहित आहे का मधुमेह आणि पायाच वेगळंच कनेक्शन आहे शुगर वाढली  कि आपल्या पायात अनेक काही लक्षण दिसून येतात. 

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने पायातील नसा आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. पायातील नसांच बराच नुकसान होतं. आणि या स्थितीला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात, ज्यामध्ये पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, वेदना होणे किंवा अनुभवण्याची क्षमता कमी होणे सुरू होते.

आणखी वाचा:  साखर ठरतेय गुडघेदुखीचं कारण..आताच थांबवा ही वाईट सवय

जेव्हा रुग्णाला पायाचे दुखणे अनुभवता येत नाही, तेव्हा त्या रुग्णाला पायाला झालेली इजा, जर कुठे कात झालं तर त्याची जाणीव होत नाही. पायांमध्ये संवेदना कमी झाल्यामुळे, पाय दुखणे किंवा इतर लक्षणच जाणीव कमी होऊ लागते अशात जखम झाली तर ती पटकन भरून निघत

नाही आणि त्यामुळे उर्वरित पायात इन्फेक्शन होऊ नये म्हणून पाय सुद्धा कापावा लागतो परिणामी कापल्या गेल्यामुळे पाय खराब होतात.

आणखी वाचा: Fact Check : कॅडबरीमध्ये बीफ, हलाल सर्टिफाइड जिलेटिन?

रक्तातील साखर वाढली की पायात ही ३ लक्षणे दिसतात

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की पायाला सूज येऊ लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पायांना सतत सूज येणे हे साखर वाढण्याचे लक्षण आहे.

पायाला जखम भरण्यासाठी बराच वेळ लागणे हे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे.

पाय सुन्न होणे हे देखील उच्च रक्तातील साखरेचे लक्षण आहे.