How To Burn Belly Fat : दिवाळी (Diwali 2022) म्हटलं की फराळ...चकली, चवडा, करंज्या, रवा - बेसन लाडू आणि वेगवेगळ्या मिठाई...सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी...दिवाळीत फराळाशिवाय वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्ण संधी असते. मग अशावेळी जिभेवर ताबा ठेवायचा कसा...वजन वाढण्याची भीती, मग आता चिंता करायची गरज नाही. अनेक जण वजन (Weight) कमी करण्यासाठी जिम (Gym) लावतात आणि डाएट (Diet) करतात. पण एवढं करुनही वजन काही कमी होतं नाही. वजन कमी करणं तसं सोपं नाही. एकदा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक महिने लागतात. अशात आज आम्ही तुम्हाला असे सुपरड्रिंक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या पोटाची आणि कंबरेची चरबी (Belly and waist fat) झपटप कमी होईल.
वजन कमी करण्यासाठी सगळ्या फायदेशीर ड्रिंक ऍपल सायडर व्हिनेगर. हे वजन कमी करण्यासोबत आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड असतं जे फॅट बर्निंग कंपाऊंड आहे. या पेयाच्या मदतीने इन्सुलिन कमी करता येते. हे वापरण्यासही सोपे आहे. तुम्ही एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर एका ग्लास पाण्यात मिसळून प्या. असे केल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल, नंतर वजन नियंत्रित करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. (Diwali 2022 Weight Loss Drinks nmp )
या ड्रिंकबद्दल सगळ्यांना माहिती आहे. याबद्दल खास सांगायला नको. जर तुम्हाला आरोग्य चांगले राखायचं असेल तर रोज ग्रीन टी घेतली पाहिजे. त्यात एपिगॅलोकाटेचिन गॅलेट नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे चरबी जाळण्यास मदत करतं आणि हळूहळू वजन कमी करण्यास मदत होते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की दिवसातून 2 कप पेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका अन्यथा नुकसान देखील होऊ शकतं.
तुम्ही कॉफी अनेकदा पीत असाल, पण तुमच्या सवयीमध्ये साखर नसलेली ब्लॅक कॉफी समाविष्ट करावी, कारण त्यात कॅलरीज नसतात आणि चयापचय वाढवतं, ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. रोज 2 ब्लॅक कॉफी प्यायल्यास वजन कमी करणे सोपे होईल.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)