पावसाळ्यात मासे खाणे टाळा

 पावसाळ्यात मासे न खाण्याचा सल्ला डॉक्टरदेखील देतात.

Updated: Jun 29, 2019, 12:07 PM IST
पावसाळ्यात मासे खाणे टाळा title=

मुंबई : मासे आवडणाऱ्या अनेक जणांना लोकांना मासे खाणे टाळणं शक्य होत नाही. माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे आरोग्यास फायदेशीर ठरणारे मासे पावसाळ्यात मात्र नुकसानकारक ठरतात. त्यामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळणे योग्य ठरेल. अन्यथा जीभेची चव आरोग्यास त्रासदायक होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात मासे न खाण्याचा सल्ला डॉक्टरदेखील देतात.

पावसाळ्यात मासे खाणं का टाळालं?

- हा काळ मासे आणि अन्य समुद्री जीवांसाठी प्रजननाचा काळ असतो. अंडी असलेले मासे खाल्याने पोटात इंफेक्शन आणि फूड पॉयजनिंग होण्याचा धोका वाढतो.

- पावसाळ्यात जल प्रदूषणाची संभावना वाढते. अशावेळी माशांवर घाण जमा होते. पाण्याने धुतल्यानंतरही तो थर निघून जात नाही. त्यामुळे मासे खाल्याने टायफाईड, कावीळ आणि डायरिया यांसारखे आजार होऊ शकतात.

- पावसाळ्यात मच्छीमारी बंद असते. त्यामुळे बाजारात ताजे मासे मिळणे कठीण होते. पॅक किंवा स्टोर केलेले मासे मिळतात. मासे अधिक काळ स्टोर केल्याने खराब होऊ शकतात. हे खाल्याने इंफेक्शनचा धोका वाढतो.