जेवणानंतर या पाच गोष्टी करणे टाळा

आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहाराचे काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आहाराचे योग्य नियम पाळल्यास आरोग्यही चांगले राहते. 

Updated: Jul 10, 2017, 09:35 AM IST
जेवणानंतर या पाच गोष्टी करणे टाळा title=

मुंबई : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहाराचे काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आहाराचे योग्य नियम पाळल्यास आरोग्यही चांगले राहते. 

जेवणानंतर लगेचच आंघोळ करू नये.

जेवणानंतर लगेचच आंघोळ करणे टाळले पाहिजे. तज्ञांच्या मते, जेवल्यानंतर आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते. ज्यामुळे पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो. 

जेवणानंतर झोपण्याची सवय हानिकारक

जेवणानंतर अनेकांना लगेचच झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. तज्ञांच्या मते, जेवणानंतर लगेच झोपल्यास खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी शरीरास अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे अपचन, वजन वाढणे यासारख्या समस्या सतावू शकतात.

धूम्रपान करणे टाळा.

जेवणानंतर लगेचच धूम्रपान करू नये. तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर त्यामुळे शरीरातील फुफुसांना नुकसान पोहचते. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराला सामोरे जावे लागते.

फळांचे सेवन टाळा

जेवल्यानंतर लगेचच फळांचे सेवन करू नये. जर जेवणानंतर फळ खाल्ल्यास बध्दकोष्ठतेचा ञास होतो. दुपारच्या अथवा रात्रीच्या जेवणानंतर फळे खाल्ल्यास त्यांचे पचन धीम्यागतीने होते. यामुळे अॅसिडिटी, जळजळ, गॅसचा त्रास होऊ शकतो.  

चहा पिणे टाळा

काही लोक जेवणानंतर चहा पितात. मात्र जेवणानंतर लगेचच चहा पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. म्हणून जेवल्यानंतर किमान एक ते दोन तासांनी चहा प्यावा.